Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल कारखान्यावर ऊस विकास कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा

 श्री विठ्ठल कारखान्यावर ऊस विकास कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा



पंढरपूर : (कटुसत्य वृत्त):- मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार १०० दिवशीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांच्याकरिता ऊस विकास कार्यक्रम अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदरप्रसंगी प्रथम श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन डॉ. अंकुश चोरमुले ऊस तज्ज्ञ व किटक शास्त्रज्ञ, सिनिअर मॅनेजर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा मंदार गडगे, आय. सी. एल. सेल्स मॅनेजर सतीश माने यांच्या हस्ते व कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी स्वागत व प्रास्ताविकामध्ये कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. बी. पाटील बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन गळीत हंगाम आपण यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत, समाज उपयोगी कार्यक्रमांतर्गत धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सर्व कारखान्यांनी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचे एकरी १०० टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. पुढील गळीत हंगामामध्ये कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर होणेसाठी योग्य ते बदल करणेचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. पुढील हंगामात आपण १२००० मे. टनापर्यंत दैनंदिन गाळप करणार आहोत. त्यावेळी त्यांनी कारखान्याच्या उभारणीपासून आतापर्यंतची सर्व इत्यंभूत माहितीचा आढावा घेतला.

कारखान्याचे जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल प्रशालेचे आर्के व ऊस पुरवठा अधिकारी नितीन पवार यांनी सदर प्रसंगी कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, दत्तात्रय नरसाळे, कालिदास साळुंखे, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिध्देश्वर बंडगर, विठ्ठलनाना रणदिवे, विठ्ठल पाटील, दशरथ जाधव, अशोक तोंडले, अशोक घाडगे, कारखान्याचे केन मॅनेजर आबासाहेब वाघ, मुख्य शेती अधिकारी अशोक गुळमकर, शेती अधिकारी दशरथ रोकडे, असि. ऊस विकास अधिकारी उध्दव बागल, ऊस पुरवठा अधिकारी शाम शिंदे यांच्यासह कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, इतर अधिकारी, शेती खात्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments