Hot Posts

6/recent/ticker-posts

विरोधी पक्षाची भूमिका बजावा

 विरोधी पक्षाची भूमिका बजावा


सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- शेतकऱ्यांची कर्जमाफी, वाढलेली महागाई, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रभारी निरीक्षक हर्षवर्धन पाटील यांनी केले.


सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांची बैठक शुक्रवारी (दि. ११) आयएमए हॉल येथे झाली. त्यावेळी निरीक्षक पाटील बोलत होते.

याप्रसंगी निरीक्षक शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, शहराध्यक्ष सुधीर खरटमल, आमदार नारायण पाटील, आ. अभिजीत पाटील, आ. उत्तमराव जानकर, माजी मंत्री लक्ष्मण टोबळे, माजी महापौर मनोहर सपाटे, यु. एन. बेरिया, अनिल सावंत, महेश गादेकर, प्रशांत बाबर उपस्थित होते. दीड तास उशिराने बैठक सुरु झाली. बैठकीस खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. राजू खरे गैरहजर होते.

चौकट 1
पक्षात सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही
कुठलीही बैठक, कार्यक्रमात पक्षात महिलांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नाही. पदाधिकारी व कार्यकारणी बैठकीच्या बॅनरवर महिला शहराध्यक्षांचा फोटो नाही. त्यामुळे सर्व महिला पदाधिकारी बैठकीवर बहिष्कार टाकणार, अशी तक्रार शहराध्यक्षा सुनीता रोटे यांनी पक्षाचे निरीक्षक हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली. त्यावेळी पाटील यांनी शहराध्यक्ष रोटे यांची समजूत काढून त्यांना बैठकीत थांबविले.

चौकट 2
पदाधिकाऱ्यांना निरोप नाहीच
पक्षाची बैठक होणार असल्याचा निरोप पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांना दिला नाही. त्यामुळे काही सदस्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली. पक्षातील काहीजण बैठक, कार्यक्रम असल्याचा निरोप देत नाहीत. पदाधिकारी, सदस्य म्हणून आम्ही फक्त कागदावरच आहोत, अशी खंत व्यक्त केली.

Reactions

Post a Comment

0 Comments