Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाने आयोजीत केलेल्या भीमगितांनी दणाणले जिल्हा परिषदेचे सभागृह

 मराठा सेवा संघाने आयोजीत केलेल्या भीमगितांनी दणाणले जिल्हा परिषदेचे सभागृह





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ समस्या मांडल्या नाही तर त्यावर उपाययोजना केल्या. पाण्याच्या नियोजनावर त्यांनी भर दिला. नदीजोड प्रकल्पाचे जनक डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. असे मत व्याख्याते प्रा. सुहास उघडे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा समाज कल्याण विभागाचे वतीने आज डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, शिक्षणाधिकारी कादर शेख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षिरसागर, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अशोक इंदापुरे, शंतनु गायकवाड, मराठा सेवा संघाचे शाखाध्यक्ष अविनाश गोडसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अनिल जगताप , सुर्यकांत मोहिते, शिवानंद मगे, कास्ट्राईब चे राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव, प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी उमाकांत राजगुरू, भगवान चव्हाण, संजय कांबळे, रामदास गुरव, चेतन भोसले, नागनाथ धोत्रे, कल्याण श्रावस्ती, चंद्रकांत होळकर, योगेश कटकधोंड, कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष दिनेश बनसोडे, समाज कल्याण विभागाचे अधिक्षक सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, स्वाती गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास अमृत कोकाटे, किशोर सावळे, समता सैनिक राजश्री कांबळे उपस्थित होते. कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने मिठाईचे वाटप अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्या हस्ते करणेत आले. लेखक दत्ता गायकवाड लिखित चैतन्याचे प्रणेते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक मराठा सेवा संघाचे वतीने वितरित करणेत आले.


जिल्हा परिषद वाहन चालक यांना निवारा व्यवस्था - अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर
……………….
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर बोलताना म्हणाले, बाबासाहेब यांनी समतेची विचार दिला. या प्रसंगी त्यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद वाहन चालक यांना निवारा व्यवस्था करावेत येणार आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय तसेच गुणवंत कर्मचारी यांचे साठी पुरस्कार योजना सुरू करणेत येणार असल्याचे अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद कास्ट्राईब संघटनेने या मागण्या केल्या होत्या.

भिमगितांनी दणाणले जिल्हा परिषदेचे  सभागृह…!
……………..
दोनच राजे इथे गाजले….या गितांनी कार्सक्रमात बहार आणली. माऊलीची माया होता….माझा भिमराव…! तसेच जन्मास आले भिमबाळ..! माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावीलं रमाण..! किती शोधला असता भीम नोटांवर ..
या भीमगितांनी जिल्हा परिषदेचे यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. मराठा सेवा संघाच्या वतीने स्वानंद परिवाराच्या पहाडी आवाजात भीमगितांचे सादरीकरण केले. गायक रूपेश क्षिरसागर, किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, अरुंधती सलगर, सायली साठे, हेमलता होटकर, कालिंदा देशमुख, एकनाथ कुंभार या गायकांनी आपल्या पहाडी आवाजाने जयंती च्या कार्यक्रमात भीमगिते म्हणून जान आणली..! इतनी शक्ती हमे दे ना दाता ..  हे गीत लक्ष्मी नागणसुरे यांनी गायले. मराठा सेवा संघटनेने दरवर्षी प्रमाणे भीमगीत सादर केल्याने सर्वानी मराठा सेवा संघटनेचे कौतुक केले.
……………….
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समस्या सोडविल्या- प्रा. उघडे

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचे योग्य नियोजन करणे साठी नदी जोड प्रकल्पाची आखणी केली. प्राधिकरणाची निर्मिती केली. धरणांची निर्मिती व पाणी वाटपाचे अधिकार प्राधिकरणास दिले. उर्जा धोरणा शिवाय औद्योगिकीकरण शक्य नाही. बाबासाहेब वीजेकडे प्रगतीचा मार्ग म्हणून पाहत होते. बाबासाहेब यांनी केवळ समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्यांवर उपाययोजना केल्या. न्यायपालिकेने समान व्यासाचे काम करावे. एक व्यक्ती, एक मत, एक मुल्य हा विचार दिला. माध्यमांनी सरकारवर जनमताचा दबाव तयार करावा असे बाबासाहेब यांचे विचार होते असेही प्रा. उघडे यांनी सांगितले.
सुत्रसंचालन कल्याण श्रीवस्ती व हेमलता होटकर यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments