Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.रणजितसिंह आणि खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

 आ.रणजितसिंह आणि खा.धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन





अकलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघात १३ एप्रिल ते ५ मे २०२५ या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक जनतेच्या विकासाला चालना देण्यासोबतच शिक्षण, रोजगार आणि शेती क्षेत्रात प्रगती साधण्याचे या उपक्रमाचे उदिष्ट असणार आहेत.

या उपक्रमांतर्गत अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेत स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने १६ एप्रिल रोजी जॉब फेअर आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात विविध कंपन्या, उद्योग आणि नोकरीइच्छुकांना एकत्र आणले जाणार असून, तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी माढा करमाळा  सांगोला तालुक्यात आधुनिक शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींची माहिती दिली जाणार आहे.

अकलूज येथील स्मृतीभावन येथे MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) अंतर्गत कार्यशाळा आणि माहिती सत्रांचे आयोजन होणार आहे. या उपक्रमातून उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि संसाधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलात बालनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत मुलांना नाट्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढवला जाईल.

माण तालुक्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन होणार आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास मदत केली जाणार आहे.

अकलूज येथे ड्रायव्हिंग लायसन्स शिबिरांचे आयोजन होणार आहे. या शिबिरांत कागदपत्रांची पूर्तता आणि चाचणी सुविधा उपलब्ध करून नागरिकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यात मदत केली जाणार आहे.

या सर्व उपक्रमांमुळे माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला शिक्षण, रोजगार आणि शेती क्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments