एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज, अलिबाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
अलिबाग,(कटूसत्य वृत्त):- एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेज, अलिबाग येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या विशेष कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. जयपाल पाटील (आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमास सुजय बाजपाई (प्रभारी अधिकारी, एस.ओ.एस. अलिबाग) व रियाज पठाण (कार्यक्रम समन्वयक) हे देखील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी मुलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र, सामाजिक न्यायासाठी त्यांचा लढा आणि संविधान निर्मितीतील योगदान यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणातून उपस्थित सर्वांना प्रेरणा मिळाली.
या जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व, चित्रकला व क्विझ स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विजेत्या मुलांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाने मुलांमध्ये सामाजिक समतेचे भान, प्रेरणा आणि नेतृत्वगुण रुजवले. एस.ओ.एस. चिल्ड्रन्स व्हिलेजच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.
0 Comments