Hot Posts

6/recent/ticker-posts

मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांसमोर २ मे रोजी तीव्र आंदोलन

 मुंबईच्या धर्मादाय आयुक्तांसमोर २ मे रोजी तीव्र आंदोलन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यामध्ये लाखो धर्मादाय विश्वस्त संस्था कार्यरत असून हजारो पक्षकार व वकील यांना गेल्या वर्षभरापासून धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र या संस्थेच्या वेबसाईट वर विविध प्रकारचे अर्ज दाखल करण्याबाबत सक्ती करण्यात आलेली आहे, परंतु शासनाने दिलेली वेबसाईट ही वारंवार बंद असल्याने ३६ जिल्ह्यातील हजारो पक्षकार व वकील यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत सोलापूर सह पुणे व अन्य जिल्ह्यातील धर्मादाय वकील संघटनांनी निवेदन दिले असून सदरची वेबसाईट सक्षमरित्या व सुरळीतपणे सुरु ठेवण्याबाबत विनंती केली आहे. परंतु त्यामध्ये काहींच सुधारणा करण्यात आली नाही. त्यामुळे सोलापूर धर्मादाय वकील संघातर्फे दि. ०२/०५/२०२५ रोजी धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र शासन, वरळी, मुंबई यांच्या कार्यालयासमारे सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत तीव्र निषेध आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर धर्मादाय वकील संघाचे अध्यक्ष अॅड. खतीब वकील व खजिनदार अॅड. ए.आर. रायनी वकील यांनी लेखी निवेदनाद्वारे दि. २१/०४/२०२५ रोजी मुंबई कार्यालयात दिलेला आहे.
 संघटनेचे सदस्य वकील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, सोलापूर विभाग या कार्यालयामध्ये वकीली करतात.  संघटनेच्या सदस्य वकीलांच्या निम्नलिखीत मागण्या आहेत.



१) आपले www.charity.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ गेल्या १ महिन्यापासून बंद पडलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो न्यासांचे न्यायिक व अन्यायिक कामकाज बंद पडलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी पक्षकारांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील सुध्दा हजारो नागरिकांना, विश्वस्तांना विनाकारण असह्य असा आर्थिक, मानसिक व शारिरिक त्रास होवून त्यांचे कधीही न भरून येणारे अपरिमित नुकसान होत आहे. सबब, आपले सदरचे संकेतस्थळ हे संपूर्णतः सक्षम होवून त्याचे कामकाज हे सुरळीत सुरू होईपावेतो आपल्या संघटनेकडे दाखल करण्यात येणारी सर्व न्यायिक व अन्यायिक प्रकरणे, अर्ज वगैरे ऑफलाईन (Offline) स्वीकारण्याबाबत त्वरित आदेश व्हावा.

२) आपल्या सोलापूर कार्यालयात संस्था / मिळकत न्यास नोंदणीच्या सर्व प्रकरणाचे   दररोज बोर्ड-Board (वाद कार्यसूची) काढण्यात यावेत व सदर सर्व प्रकरणांचे रोजनाम नियमितपणे दररोज लिहून त्या प्रकरणातील तारखा दररोज आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध (अपलोड) करण्यात याव्यात.

3) संस्थान्न्यास नोंदणी प्रकरणामध्ये सरतपासावी / अंतिम प्रतिज्ञापत्र दाखल करण्याबाबत तोंडी आग्रह धरला जात आहे. वास्तविक पाहता असे प्रतिज्ञापत्र दाखल करणे हे मुळीच आवश्यक व बंधनकारक नाही. सबब असे प्रतिज्ञापत्रात आग्रह धर नये असा आदेश व्हावा.

6) आपल्या संघटनेतील कामकाज हे ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचे तारख जी न्यास नोंदणी प्रकरणे व विश्वस्त निधी नोंदणी प्रकरणी ऑफलाईन (Offline) होती. त्या सर्व प्रकरणामधील न्यास नोंदणी प्रमाणपत्रे त्वरित देण्यात यावीत, अशी जी वादातील प्रकरणे प्रलंबित आहेत अशा प्रकरणांना ऑनलाईन कार्यप्रणातील प्रकरण नोंदणी क्रमांक देवून त्यांचे कामकाज त्वरित सुरू करण्यात यावे.

वरील प्रकारे राज्यातील ३६ जिल्ह्यामध्ये लाखो पक्षकार व वकील यांना होणारा त्रास व बिलंब वाचविण्याच्या दृष्टीने, बेबसाईट सुरळीतपणे सुरु होईपर्यंत धर्मादाय आयुक्त यांनी सर्व जिल्ह्यामध्ये ऑफलाईन पद्धतीने सर्व प्रकरणे स्विकारणे ही प्रामुख्याने मागणी आहे.



Reactions

Post a Comment

0 Comments