पंढरपूर येथे पांचाळ सुतार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- रविवार दिनांक 20/4/2025 रोजी पंढरपूर येथे विश्वकर्मा पांचाळ सुतार सामाजिक संस्था सोलापूर आयोजित पंढरपूर यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्याचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक तर अध्यक्ष म्हणून हनुमंतराव पांचाळ (पुणे राज्य प्रदेशाध्यक्ष )उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की विश्वकर्मीय समाजाची व्याप्ती खूप मोठी आहे .अशा या विश्वकर्मीय समाजा तील सुतार समाज हा आपल्या कुशल तेवर आजच्या युगात टिकून आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेने केलेल्या कार्याचे कौतुक केले .व या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सुतार समाजातील खेड्यापाड्यातील मुला मुलींची शहरांमध्ये शिक्षणासाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच मेकॅनिकल चौकास "विश्वकर्मा चौक" असे नाव देण्यासाठी आपण पाठ पुरावा करून ते काम मार्गी लावू असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात हनुमंतराव पांचाळ यांनीही या संस्थेचे कार्य चांगले असल्यामुळे तोंड भरून कौतुक केले व सर्व सुतार समाज बांधवांनी एकत्र येऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . तसेच वसतिगृहासाठी आम्ही आपल्या संस्थेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रास्ताविकामध्ये संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सुतार यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने आत्तापर्यंत केलेल्या समाज हिताच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. तसेच वधू वर व त्यांचे पालक यांना आपला योग्य तो जोडीदार निवडण्यासाठी मोठ्या अपेक्षा न ठेवता जोडीदार निवडावा यासाठीच हे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे असे म्हणाले.
या कार्यक्रमा प्रसंगी मधुकर सुतार यांनी संत बंधू जळोजी -मळोजी महाराज यांच्या विषयी लिहिलेल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमा चे औचित्य साधून समाजातील यूपीएससी एमपीएससी व मेडिकल क्षेत्रातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंताचा योग्य तो सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला .सामाजिक बांधिलकी जोपासताना रक्त दान शिबिराचे व आरोग्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरात अनेक युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून रक्तदान केले. या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा व जिल्ह्याबाहेरील वधू-वर यांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी केली. सदर कार्यक्रमात सकाळ सत्रात बनसोडे व राम सुतार यांनी पी एम विश्वकर्मा योजना व बांधकाम कामगार योजना याविषयी युवकांना सखोल असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत कांडेकरी (कोल्हापूर) सतीश शिंदे (बुलढाणा )राजेश भालेकर (जालना) बापूराव भालेकर (बीड )दिलीप आकोटकर (अमरावती) दत्तात्रय खैरनार (नाशिक )सुरेश राऊत (नगर) हरिश्चंद्र पांचाळ( लातूर) मनीष रुले (अकोला) शरद धावड (सोलापूर )डॉक्टर बसवराज सुतार (पंढरपूर) सुभाष मस्के (पंढरपूर )प्रशांत आप्पा पाटील (बार्शी) शशिकांत सुतार (सांगली,) गणेश सुतार (सांगली) बाळासाहेब सुतार( वडाळा) ॲड .नानासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम व्यवस्थित व यशस्वी पणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत सुतार मधुकर आढळकर नरसिंग सुतार सतीश सुतार सचिन सुतार राजेंद्र सुतार भरत गवळी अक्षय सुतार विजय मोरे दत्तात्रय पांचाळ वसंत सुतार रविराज घोडके रवींद्र पांचाळ भारत काळे धनंजय सुतार कालिदास आढवळकर राजेश महामुनी रमेश सुतार शिवदास सुतार अंबादास सुतार रावसाहेब रोकडे सखाराम डोरले नितीन सुतार सतीश आढवळकर तुकाराम सुतार आप्पा सुतार सुरज डोळस राजू आढवळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघमारे आनंद पिंपळे सौ सुषमा पांचाळ व कु. साक्षी पांचाळ( पुणे) यांनी केले तर आभार प्रदर्शन मधुकर सुतार यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Comments