Hot Posts

6/recent/ticker-posts

नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा

 नागेश करजगी ऑर्किड स्कुल मध्ये जागतिक वसुंधरा दिन साजरा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुलमध्ये पृथ्वीदिनाचे औचित्य साधून जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे मॅम यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वसुंधरा संवर्धनाची शपथ देण्यात आली.
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी वसुंधरेवर आधारित पोस्टर प्रदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी पृथ्वी ची काळजी कशी घ्यावी यावर भाषणे केली. तसेच विद्यार्थ्यांनी या उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची सोय म्हणून पक्षांची घरटी व त्यांना पाणी पिण्यासाठी सोईयुक्त अशी पाणवठे तयार केली होती. ती शाळेच्या आवारातील झाडावर लावण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार करजगी व संस्थेच्या सचिवा सौ.वर्षाताई विभूते यांनी कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लतीफा सगरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments