वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे राष्ट्रीय एकात्मता बंधुता यासाठी ईद मिलन व चालक मेळाव्याचे आयोजन
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने हैदराबाद रोडवरील गोल्डन न हॉलमध्ये ईद-ए-मिलन चालक मेळाव्याचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आमदार विजयकुमार देशमुख
वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद माझी महापौर जनार्दन कारमपुरी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे
शहर युवक अध्यक्ष प्रशांत बाबर
यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांनी बोलताना म्हणाले वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे पासिंग विलंब शुल्क या विरोधात सलग ५० दिवसे आंदोलन उभे करून शासनाला पासिंग विलंब शुल्क मागे घेण्यास भाग पाडले तसेच हिट अँड रण कायद्याविरोधात सर्वात प्रथम वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे रस्ता चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते याचेच परिणाम म्हणून केंद्र सरकारने हिट अँड रन ला स्थगिती दिली आहे असे म्हणाले
मालवाहतूक प्रदेश अध्यक्ष लाडजी नदाफ यांनी मार्केट यार्डातील चालकांचे प्रश्न मांडले मुळेगाव रोड आणि हैद्राबाद हायवे चे विविध समस्या आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कडे मांडले
महासंघ सातत्याने चालकांसाठी काम करत आहे आपल्या मांगण्या लवकरात लवकर महासंघाला सोबत घेऊन पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालवाहतूक प्रदेशाध्यक्ष लाडजी नदाफ प्रदीप शिंगे,अल्लाबक्ष शेख,देविदास कोळी,इरफान कल्याणी शंकर राऊत रमेश बनसोडे अल्लीशेर पटेल गोस शेख,इस्माईल गुंता,हकीम नदाफ,मोईन नदाफ,
रफिक शेख,इरफान तहसीलदार,अजम मकानदार,साबीर कुरले,संजय कुराडे ,अक्षय जाधव आदींनी परिश्रम घेतले
0 Comments