Hot Posts

6/recent/ticker-posts

माळीनगर येथील पीर पठाणबाबा यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा

 माळीनगर येथील पीर पठाणबाबा यांचा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळीनगर येथील हिंदू मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान व सर्व बहुजनांचे प्रेरणास्थान असलेल्या पीर पठाणबाबा ऊर्स मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी दि सासवड माळी शुगर फॅक्टरीचे चेअरमन रंजनभाऊ गिरमे यांच्या शुभहस्ते मानाची चादर चढविण्याचा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमासाठी माळीनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अनुपमा एकतपुरे,उपसरपंच अतुल कांबळे,प्रदिप निंबाळकर, शिरीषभाई फडे,व्यापारी संघटनेचे मार्गदर्शन,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रिंकू राऊत, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण डोईफोडे,हजारे साहेब,सोमनाथ हुलगे,गेजगे मॅडम,तांबोळी हवालदार,आदमभाई तांबोळी, अनिल लोंढे,बाळासाहेब वजाळे, भैय्या कांबळे,निलेश एकतपुरे आदी उपस्थित होते.
             हा ऊर्स कार्यक्रम पार पडण्यासाठी हाजी जब्बार तांबोळी,लायक सय्यद,जाफर सय्यद,सिकंदर शेख,रियाज मुलाणी,मुन्ना काझी,रमजान इनामदार,रसूल शेख,समीर शेख,इमाम शेख,इकबाल जमादार,मुबारक शेख,शेख सर, डॉ.अस्लम शेख,डॉ.फारूख शेख,खानसाब यांनी परिश्रम घेऊन हा ऊर्स कार्यक्रम पार पडला.शेवटी मौलाना जुबेर सय्यद यांनी फातेहा व सलामचे पठण करून या कार्यक्रमाची सांगता झाली.

Reactions

Post a Comment

0 Comments