धान्याच्या साठवणुकीसाठी केमिकल च्या टाक्यांचा वापर टाळावा- प्रा. जयपाल पाटील
अलिबाग (कटूसत्य वृत्त):- आपल्या घरामध्ये धान्याच्या व पाण्याच्या साठवणुकीसाठी आपल्याकडे केमिकल च्या टाक्या स्वस्तात मिळतात म्हणून घेऊ नका कारण तुम्ही कितीही स्वच्छ धुवून वापर करीत असला तरी त्याच्या टाकीला व सभोवताली लागलेलं केमिकल पूर्णपणे निघून जात नाही त्यामुळे आपल्या घरातील सर्व जणांना विशेष करून लहान मुलांना पोटाचे विकार अगदी कॅन्सर पर्यंत मजल पोहोचून कुटुंबावर आपत्ती येते यासाठी याचा वापर करू नये असे आवाहन सातीर्जे ग्राम पंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन शिबिरात आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांनी सांगितले.व्यासपीठावर ग्राम पंचायतीच्या प्रशासक प्रार्थना भोईर, डॉ. जयपाल पाटील, कृषी सहाय्यिका कुमारी मृणाली सोनवाल, माजी सरपंच प्राजक्ता खडपे, डॉक्टर अहमद खान पूजा पाटील ग्रामविकास अधिकारी सौ रीना माळवी मुख्याध्यापिका आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गणेश पूजन होऊन सर्वांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
प्रारंभिक प्रशासक प्रार्थना भोईर म्हणाल्या सातीर्जे ग्रामस्थांना आपत्तीच्या वेळी कोणकोणत्या काळजात याची माहिती असावी. म्हणून रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे रायगड जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती हा कार्यक्रम आमचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार ग्रामविकास अधिकारी पूजा पाटील यांनी आपल्यासाठी आयोजित केला असून येथील महत्त्वाची माहिती आपल्या शेजाऱ्यांना सांगावी. यावेळी प्रा. जयपाल पाटील यांनी केमिकल च्या टाक्या आपणास स्वस्त्यात मिळत असतात म्हणून त्याचा वापर करताना काळजी घेतलीच पाहिजे. त्यातील केमिकल मुळे संपूर्ण शरीरावर आपत्ती येऊन आपलेच नुकसान होते. महिलांना घरामध्ये रस्त्यावर बाळंतपणाच्या शेवटच्या काळात 108 रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक देताना बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे जिल्हाप्रमुख जीवन काटकर यांना दूरध्वनी करताच नागोठणे येथून 108 रुग्णवाहिका डॉक्टर अहमद खान व पायलट मंगेश गावंड येऊन 108 रुग्णवाहिकेच्या वापराची माहिती दिली.महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचे संपर्क करावा याचेही प्रत्यक्ष देताना मांडवा पोलीस ठाण्याचे हवालदार नितीन माळी व प्रणव पाटील उपस्थित राहून आपल्या सुरक्षेसाठी याचा वापर कसा करावा याची माहिती दिली. त्याचबरोबर आपल्या घरात शेतावर साप विंचू दंशाच्या वेळेची काळजी घरातील गॅस व त्याची नळी याच्या सुरक्षा बाबत, शेतकऱ्यांना वीज पडून आपत्ती येथे त्याबाबतची दामिनी ॲप ची माहिती दिली, आणि महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याची, त्यामधून मिळणाऱ्या मदतीची माहिती दिली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना भात आंबे पिकांवर येणाऱ्या आपत्ती बाबत कृषी सहाय्यक कुमारी मृणाली सोनवाल हिने शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना, पिकांवर येणाऱ्या आपत्यांबाबत माहिती दिली त्याचबरोबर उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक समाधान थळकर यांनी केले यावेळी अशोक म्हात्रे पत्रकार अंगणवाडी सेविका मोहिनी खोत, श्रीमती वंदना राऊत अशा सेविका रेखा काटे, समाजसेविका जयश्री बांदिवडेकर, प्रगतिशील शेतकरी रमेश म्हात्रे रुपेश पाटील परहुर पाडा कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातीर्जे विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments