Hot Posts

6/recent/ticker-posts

लाडकी बहिण सारख्या योजना राबविल्यामुळेच पुन्हा युतीचे शासन- उद्योगमंत्री उदय सामंत

 लाडकी बहिण सारख्या योजना राबविल्यामुळेच पुन्हा युतीचे शासन- उद्योगमंत्री उदय सामंत





राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजमुळे शेतकऱ्यांना होणार फायदा

माढा, (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मागील वेळी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेले व नैसर्गिक युती वाटणारे सरकार सत्तेत आले होते.  लाडकी बहिण सारख्या योजना राबविल्यामुळेच पुन्हा युतीचे शासन आल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माढयात सोमवारी (ता. २१) राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना सांगितले.

   यावेळी उद्योगमंत्री सावंत म्हणाले की राजवी आॅईल मिलमुळे परिसरात शेतकऱ्यांना फायदा होणार असून युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या लाडकी बहिण सारख्या निर्णयामुळे महिलांना फायदा होत आहे. लाडकी बहिण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे सरकार पुन्हा सत्तेत आले.

यावेळी पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले की राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पृथ्वीराज सावंत उभा करत असलेला हा प्रकल्प या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपापल्या तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ द्यावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष बांधणीवरती भर दिलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नही प्रा. शिवाजी सावंत यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत.  प्रा. सावंत यांच्या पाठीशी आम्ही सर्वजणच खंबीरपणे उभे आहोत. भविष्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माढा दौरा नक्की होणार आहे.

  या कार्यक्रमास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी योजना मंत्री शंभूराज देसाई, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, माजी आमदार धनाजीराव साठे, राजन पाटील, संजय शिंदे, राजवी ॲग्रो ऑइल इंडस्ट्रीजचे चेअरमन पृथ्वीराज सावंत, वाकावचे सरपंच ऋतुराज सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख मुन्ना साठे, कालिदास सावंत, अमोल शिंदे, मनोज शेजवाल, दिग्विजय बागल, महंत श्री शिवरुपानंद स्वामीजी (सहमंत्री आखिल भारतीय संत समिती, कोकण प्रांत) राजपुरोहित बेदमूर्ती रवींद्र भगवान पाठक, अमर पाटील, विजय राऊत, किरण सावंत, संजय सावंत,  झुंजार भांगे, दादासाहेब साठे, अशोक लुणावत, साईनाथ अभंगराव, उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,
बंडूनाना ढवळे, अरविंद खरात, स्वप्निल खरात, अजिंक्य काटे यांच्यासह हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिवाजीराव सावंत यांनी केले.
ऐश्वर्या हिबारे यांनी सुत्रसंचलन केले. आभार पृथ्वीराज सावंत यांनी मानले.

             -- चौकट --

उद्योगमंत्री उदय सामंत व पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीची बैठक असल्याने त्यांची इच्छा असूनही माढयातील या कार्यक्रमाला येता आले नाही. शिंदेसाहेबांचा आम्हा दोघांनाही आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राजवी ॲग्रोच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास सांगितले.

   -- चौकट --

एसटी कामगार सेनेच्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी व व महिलांनी शिवसेना शिंदे गटात यावेळी प्रवेश केला. दोन्ही मंत्र्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
Reactions

Post a Comment

0 Comments