टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर जाणता राजा,अटकेपार झेंडा दोन गटात तुफान हाणामारी
चार जण जखमी ?..अद्याप टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी पोलीस स्टेशन समोर असणाऱ्या कुर्डूवाडी चौकामध्ये जाणता राजा मित्र मंडळ व अटकेपार झेंडा या दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून या मध्ये जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर महाडिक व अटकेपार झेंडा चे संस्थापक अध्यक्ष दयानंद महाडिक यांचे बंधू राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख- महाडिक व इतर तीन जण जखमी झाल्याचे समजते. ही घटना गुरुवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास टेंभुर्णी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कुर्डूवाडी चौकात घडल्याने टेंभुर्णी शहरातील मेन रोड कुर्डूवाडी चौकात वातावरण काही काळ तणावाचे झाले होते.
या घटनेबाबत टेंभुर्णी शहरातून गोपनीय सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उजनी धरणावरून सीना- माढा सिंचन योजनेअंतर्गत कॅनॉलचे पाणी शेतीसाठी फळ, पिके, ऊस ,व जनावरांसाठी मका ,कढवळ,भिजवण्यासाठी आवर्तन चालू आहे त्याचे पाणी छोट्या मायनरला घ्ययचे होते मात्र हे पाणी घेण्याच्या वादावरून बुधवारी संध्याकाळी दोन्ही गटात शिवीगाळ व धक्काबुक्की होऊन किरकोळ भांडणे झाल्याची समजते. मात्र याच गोष्टीचा मनात राग धरून गुरुवारी सकाळी अटकेपार झेंड्याचे संस्थापक अध्यक्ष दयानंद महाडिक-देशमुख व
राष्ट्रवादीचे माजी माढा तालुकाध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख व जनता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर महाडिक व त्यांचे पुतणे टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव महाडिक- देशमुख यांच्यासह दोन गटाचे कार्यकर्त्यांची महाडिक वस्ती कॅनललगत पुन्हा गुरुवारी सकाळी मारामारी झाल्याचे समजते.
या मध्ये एक महिला व दोन ते तीन जण जखमी झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे त्याचाच राग मनात धरून टेंभुर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी काही मंडळी येत असतानाच जनता राजा मित्र मंडळ चे कार्यकर्ते व अटकेपार मित्र मंडळाचे कार्यकर्ते हे कुर्डूवाडी चौकात येतात पोलीस ठाण्याला जाण्या अगोदरच गाड्या एकमेकाला आडव्या लावून आमने-सामने दोन्ही गटांचे दहा ते बारा व दुसऱ्या गटाची दहा ते बारा जण कार्यकर्ते
येऊन भिडल्याने टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या कुर्डूवाडी चौकामध्ये तुफान काट्या व जिलबी वाल्यांच्या लाकडाच्या ढलप्या घेऊन जोरदार हाणामारी फिल्मी स्टाईलने दोन गटात चालू होती मात्र माराच्या भीतीपोटी टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य वैभव देशमुख-महाडीक यांनी यातून पळ काढल्याचे समजते अशातच बघता बघता कुर्डूवाडी चौकात भीतीचे वातावरण व ट्राफिक जाम झाले होते अनेक नागरिक मारामारी पाहून सैरावैरा होऊन भयभीत झाले होते.
त्याच क्षणी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील व त्यांचा स्टॉप पोलिसांनी येऊन काट्यांचा धाक दाखवत सर्व वातावरण शांत केले व दोन्ही रस्त्यावरती ट्राफिक जाम झालेले पुन्हा सुरळीत केले मात्र या झालेल्या तुफान हाणामारीत जखमी झालेले टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते मात्र त्यांनी अद्याप तक्रार दिली नसून जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बापू देशमुख -महाडिक व त्यांचे कार्यकर्ते अकलूज येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते तर राष्ट्रवादीचे माजी तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख -महाडिक व इतर तीन जण सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटल ला उपचार घेत असून अद्याप टेंभुर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नसून या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हॉर्न का वाजवला म्हणून दोन गटात मारामारी झाली होती त्याचे वातावरण निवळते ना निवळते तोपर्यंत ही दुसरी घटना टेंभुर्णी शहरात पोलीस स्टेशन समोर घडल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची दिसून येत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांतून बोलले जात आहे या दोन्ही गटाने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दिली नसून ते प्राथमिक उपचारासाठी काही अकलूज मध्ये खाजगी हॉस्पिटल ला उपचार घेत आहेत
सध्या दोन्ही गटांमध्ये वातावरण तणावाचे असून या घटनेमुळे पुन्हा काहीतरी घडण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते त्यामुळे टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपक पाटील कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी सक्षम ठरणार का ? अपयशी ठरणार ? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधले आहे
*चौकट*
*१) राष्ट्रवादी माजी तालुकाध्यक्ष औदुंबर देशमुख-महाडीक*
आजपर्यंत मी कधीही भांडण केले नाही मी नेहमी कुठली ही भांडणे असेल तर मिटवण्यासाठी प्रयत्न करतो आज सकाळी झालेल्या भांडणाची तक्रार देण्यासाठी मी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला चाललो असताना मला आडवी गाडी घालून मारण्याचा प्रयत्न केला*
*चौकट*
*२) जनता राजा मित्र मंडळ अध्यक्ष सुधीर देशमुख-महाडीक*
*मी दवाखान्यात गेलो होतो माझे शुगर वाढल्यानंतर मी शहाच्या मेडिकल मध्ये जात असताना माझ्या पुतण्याच्या गाडीवरती हल्ला करत असल्याचे मला दिसून आल्याने मी धावून गेलो व मी त्याला सोडवत असताना मला सात ते आठ जणांनी मिळून मारले असून तो माझ्यावर मोठा अन्याय झाला आहे मला न्याय मिळावा*
*चौकट*
*३) टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील*.
*या घटनेची माहिती कळताच आम्ही पाच मिनिटात कुर्डूवाडी चौकात जाऊन तातडीने दोन्ही गटातील आरोपींना टेंभुर्णी पोलीस ठाणे मध्ये आणले व त्यांना तातडीने प्राथमिक उपचार केंद्र टेंभुर्णी येथे पाठवले परंतु त्यांनी रिफायर करून अकलूज व सोलापूर येथे ते उपचार घेत आहे त त्या ठिकाणी आज तक्रार घेण्यासाठी मी स्टीम पाठवली होती परंतु त्यांच्या डॉक्टरांनी पेशंटची तक्रार देण्यासारखी मनस्थिती नसल्यामुळे तुम्ही नंतर या असे सांगितले त्यामुळे अद्याप तक्रार दाखल नसली तरी पण आम्ही प्रयत्न करत आहे कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही*
वरील बातमीचे तीन चौकटीचे तीन फोटो पाठवले आहेत बातमी फोटो सहित घ्यावी ही नम्र विनंती
१) टेंभुर्णी पोलीस निरीक्षक दीपक पाटील
२) राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी माढा तालुका अध्यक्ष औदुंबर देशमुख-महाडिक
३) जाणता राजा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुधीर बापू देशमुख-महाडिक
0 Comments