Hot Posts

6/recent/ticker-posts

बारामती मध्ये अजित दादांनी केलेला पराभव पडळकरांच्या जिव्हारी लागला- अक्षय भांड

 बारामती मध्ये अजित दादांनी केलेला पराभव पडळकरांच्या जिव्हारी लागला- अक्षय भांड


 
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात यावर्षी साजरी करण्यात येणार आहे.यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राम शिंदे यांच्यासह अनेक मातब्बर नेते उपस्थित राहणार आहेत.या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आ.गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंती उत्सव सोहळा कार्यक्रमाचे आमंत्रण देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकर यांचा समाचार घेतला आहे. 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्यांच्या दरबारामधये लोकांना न्याय देण्याचे काम केले.या थोर महापुरुषांच्या आदर्श विचारांनी आमचे नेते अजित पवार हे काम करत आहेत.जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असुन महाराष्ट्राच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत.या त्यांच्या कार्यपद्धती मुळे महाराष्ट्र ने त्यांच्यावर भरभरून प्रेम केले आहे.याची प्रचिती २०१९ च्या बारामती विधानसभा मध्ये गोपिचंद पडळकर यांना आली  तो पराभव त्यांच्या खुपचं जिव्हारी लागला असल्याने ते नेहमी वैफल्यतुन अशी व वकतव्य करत असतात.अजित पवार यांनी महाराष्ट्रातील धनगर समाजाला विविध पदांवर काम करण्याची संधी दिली.धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांच्या कोणत्याही अडचणी अजित पवार प्राधान्याने सोडवत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments