महापालिका मलेरिया विभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- जागतिक हिवताप दिन सोलापूर महानगरपालिका नागरी हिवताप योजना मलेरिया विभागाच्या वतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मलेरिया विभागाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली.
संपूर्ण जगभरात जागतिक मलेरिया दिन साजरा करण्यात येतो. मलेरियाविरोधात जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि या प्राणघातक आजाराविरुद्ध लढण्याच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी मलेरिया दिन साजरा केला जातो. यानिमित्त महानगरपालिका नागरी हिवताप योजना मलेरिया विभागाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. विभागाच्या प्रमुख स्वाती अनपट यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरवात करण्यात आली. मलेरिया आजाराचा प्रसार रोखणे व डासांबाबत जनजागृती करण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेवून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी मलेरिया विभागाचे अधिकारी जहूर यादगिर, निरीक्षक पुजारी, सेवक रफिक शेख, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.
0 Comments