अक्कलकोट शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट : (कटुसत्य वृत्त):- जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी महासंघाच्या वतीने श्री खंडोबा मंदिरपासून जुना तहसील कार्यालपर्यंत मूक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
अक्कलकोट व्यापारी महासंघाच्या वतीने सोमवारी अक्कलकोट बंदचे आवाहन करण्यात आले होते. या वाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी महासंघाकडून मूक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष मल्लीनाथ साखरे, उपाध्यक्ष प्रसन्न हत्ते, सचीव नितीन पाटील, खजिनदार प्रकाश उण्णद, सह खजिनदार विजयकुमार कुलकर्णी, कार्याध्यक्ष दिनेश पटेल, सिद्धाराम टाके, राजशेखर हिप्परगी, संतोष पत्तरगे, बागवान, मुल्ला, गुंडु घिवारे संतोष घिवारे, नितीन महाडकर, सुयश शहा, राजू शहा, रामू पाटील, अप्पासाहेब पाटील, चेतन साखरे, राजशेखर सोड्डे, अजय आडवितोटे, प्रमोद पाटील, स्वामीनाथ आलदी, प्रशांत केसकर, प्रकाश धिवारे, ऐजाज मुतवल्ली आदींसह विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट १
कायमचा बंदोबस्त करा
व्यापारी महासंघाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांत शांतता प्रस्थापित झाली होती. मात्र, पहेलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करून काश्मीर अशांत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारताने कायमस्वरुपी दहशतवाद्यांचा
बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
0 Comments