Hot Posts

6/recent/ticker-posts

२६ मे पासून सोलापूर ते गोवा विमानसेवा : जिल्हाधिकारी

 २६ मे पासून सोलापूर ते गोवा विमानसेवा : जिल्हाधिकारी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर ते गोवा सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते हैदराबाद या तीन शहरांसाठी विमान सेवा सुरू होणार असल्याची बातमी मध्यंतरी समोर आली होती. यामुळे सोलापूरकरांच्या माध्यमातून सातत्याने या विमानसेवेच्या बाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आता याच संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आधी सोलापूर ते गोवा यादरम्यान विमान सेवा सुरू केली जाणार आहे, असे सांगितले. कुमार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सोलापूर गोवा विमान सेवा २६ मे पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास वेगवान होणार असून त्यांना जलद गतीने गोव्याला पोहोचता येणार आहे. फ्लाय ९१ या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून ही प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात सुद्धा हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला. त्यावेळी भाजपामधील अनेक मंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातील आश्वासन सुद्धा दिले होते. केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल, असे सांगितले होते. यानुसार, आता २६ मे पासून सोलापूर गोवा विमान सेवेचा प्रारंभ होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments