Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक तिरंगी; खरी लढत दुरंगी

 निवडणूक तिरंगी; खरी लढत दुरंगी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल कोणत्याही गटाला पाठिंबा न देता प्रचारापासून अलिप्त आहेत तर सुरुवातीस निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी भूमिका घेऊन आपण या निवडणुकीत पंचाची भूमिका करणार असल्याचे जाहीर केलेले माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांच्या पॅनलच्या प्रचार शुभारंभात सहभाग नोंदविला आहे. संजयमामा शिंदे यांच्यासोबत आमदार रोहित पवार यांचे समर्थक असलेले सुभाष गुळवे हेही आहेत. प्रा. रामदास झोळ यांच्या पॅनलचा प्रचार गावोगावी दिसून येत आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी असली तरी खरी लढत दुरंगीच रंगली आहे. त्यामुळे नारायण पाटील आणि संजयमामा शिंदे यांच्यात कोण बाजी मारणार, याची चर्चा  सुरू आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments