Hot Posts

6/recent/ticker-posts

सा.बा.विभागाची गांधिगिरी -शिवसेनेने काढले झाड

 सा.बा.विभागाची गांधिगिरी -शिवसेनेने काढले झाड

 


 माढा (कटूसत्य वृत्त):- माढा शेटफळ मार्गावरील गालिशी बाबा दर्ग्यानजिक असलेले  झाड उन्मळुन पडल्याने वाहतुकीला अडचण निर्माण झाली होती.अखेर सा.बा.विभागाला शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभु साठे यांनी झाड काढून गांधिगिरी दाखवली आहे.


मागील  तीन दिवसापूर्वी वादळी वार्याने  पिंपळाचे झाड पडले होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्याना नागरिकांनी झाड बाजूला काढण्याची मागञी केली होती. मात्र सा.बा.विभागाने दखलच  न घेतल्यामुळे स्वखर्चाने जेसीबी मशीन व टॅकट्ररद्वारे 
 झाड बाजूला सारुन वाहतूक कोंडी थांबवली. या प्रसंगी 
 शंभू साठे,आकाश कांबळे, पिंटू वाळके,शेखर कचरे, अतुल धुमाळ,संदीप साठे, वसंत पाटील , गौतम शिंदे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments