ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंच्या ताफ्याला दाखवले कोंबड्याचे चित्र
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मंत्री नितेश राणे हे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील मड्डी वस्ती येथे साकारण्यात आलेल्या 51 फुटी हनुमान मूर्तीचे पूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
दरम्यान, सोलापुरात मंत्री नितेश राणे दाखल झाल्यावर त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्याचे चित्र दाखवल्याचा प्रकार घडला आहे. सोलापूर विमानतळाबाहेर नितेश राणे यांचा ताफा येत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंबड्याचे चित्र दाखवले.
कागदावर कोंबड्याचे चित्र काढून मंत्री नितेश राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. नितेश राणे आज हिंदू विराट सभेच्या निमित्ताने सोलापुरात दाखल झाले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संतोष घोडके आणि शिवसैनिकांनी राणेंना कोंबड्याचे चित्र दाखवले. नितेश राणे यांचा ताफा विमानतळाबाहेर पडत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला.
0 Comments