वाहतूक संघटना संयुक्त महासंघातर्फे शनिवारी ईद मिलन कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने शनिवार दि. 19 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता गोल्डन, हॉल मुळेगाव रोड येथे ईद मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. याप्रसंगी सोलापुरातील सर्व चालक-मालक, प्रतिनिधी, अधिकारी, राजकीय नेते, पदाधिकारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम आपसी भाईचारा आणि एकता वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित केला जात आहे. वाहतूक संघटना संयुक्त महासंघ नेहमीच सामाजिक एकता आणि सांस्कृतिक समन्वयाला प्रोत्साहन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा ईद मिलनचा कार्यक्रम म्हणजे सर्व समुदायांना एकत्र आणून परस्पर प्रेम आणि आदर वाढविण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे रियाज सय्यद यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अक्षय जाधव, संजय कुराडे, हजरत शेख, प्रदीप शिंगे, लाडजी नदाफ आदी उपस्थित होते.
0 Comments