उमाबाई श्राविका क. महाविद्यालयास राष्ट्रीय उत्कृष्ट शाखा पुरस्कार प्रदान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर उमाबाई श्रविका विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयास मानाचा राष्ट्रीय उषाताई मोहाडीकर उत्कृष्ट शाखा पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. नुकत्याच कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या 57 व्या वार्षिक अधिवेशनामध्ये मा. कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या शुभहस्ते व अखिल भारतीय साने गुरुजी कथामालाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामराव कराळे, लालासाहेब पाटील, सुनील पुजारी, अशोक म्हमाने, गजानन कोठेवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य विलास लेंगरे, प्रा. प्रतिभा कंगळे, प्रा.गणेश लेंगरे, प्रा.अर्चना कानडे, व सर्व शिक्षक यांनी सन्मानपत्र, शाल, पुस्तक व 5000 रुपये रोख या स्वरूपात पुरस्कार स्वीकारला.
श्राविका महाविद्यालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची शाखा कार्यरत आहे. या शाखेच्या माध्यमातून पूज्य साने गुरुजींचे विचार, संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी महाविद्यालयामध्ये श्यामची आई पुस्तकाचे प्रकट वाचन, साने गुरुजी कथाकथन अभियान, लोकप्रबोधन अभियान, निबंध स्पर्धा, कथा कथन स्पर्धा, संस्कार परीक्षा, घोषवाक्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, यासारखे विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, निसर्ग पर्यटन, किशोरी मिळावे, कवी संमेलन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामान्यज्ञान परीक्षा, विद्यार्थी समुपदेशन, बुक बँक, पर्यावरण संवर्धन कार्यक्रम, स्वच्छता अभियान, स्व-संरक्षण प्रशिक्षण, यासारखे अनेक विध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कथामालेच्या माध्यमातून चालणाऱ्या या सर्व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन उमाबाई श्राविका विदयालय व कनिष्ठ महाविद्यालयाची अखिल भारतीय स्तरावर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी कथामालेचे सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, तसेच प्रा.अविनाश मुळकुटकर, प्रा.सोमनाथ राऊत, प्रा.प्राजक्ता काळे, प्रा.कल्याणप्पा हायगोंडे उपस्थित होते.
हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे विश्वस्त मा. यतीन शहा, मा.अंजली शहा, मा.रोहिणी शहा, मा.करण शहा, मा.अतुल शहा, सीईओ मा.देवई शहा, वरिष्ठ दीप्ती शहा, प्राचार्य सुकुमार मोहोळे, उपप्राचार्या अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments