Hot Posts

6/recent/ticker-posts

शाळेतील सोयींची होणार तपासणी

 शाळेतील सोयींची होणार तपासणी



सोलापूर : (कटुसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शाळेतील सोयीसुविधांची तपासणी करून एक महिन्यात अहवाल पाठवावा, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांची तपासणी होणार आहे.

जिल्हा परिषदेसह महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद आदी शाळेतील सोयीसुविधांची तपासणी १५ मेपर्यंत करून त्याचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सर्व शाळेत काय सोयीसुविधा आहेत, याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाकडे जाणार आहे.

दरम्यान, शाळेतील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनुजा प्रभू देसाई आहेत. राज्यस्तरीय समितीमार्फत वेगळा आढावा घेण्यात येणार आहे.

चौकट १
महिन्यातून दोनवेळा तपासणी करा .
जिल्हा समितीने महिन्यातून किमान दोन शाळांना भेट देणे गरजेचे आहे. ज्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा आहेत, अशा शाळा, इमारत, स्वच्छतागृह, किचन आदी पर्याप्त सुविधा आहेत की नाहीत अशांचा समावेश करावा, असे आदेशात म्हटले आहे. शाळा तपासणी अहवाल दिलेल्या नमुन्यातच भरण्यासही सांगितले आहे.

चौकट २
हे अधिकारी करणार तपासणी
केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, सहायक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी महापालिका, गटशिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी, नगरपालिका, जिल्हास्तरीय समितीमार्फत शाळा तपासणी करण्यात येणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments