व्हिडिओ निर्मित स्पर्धेत शीला हावळे यांचा उल्लेखनीय यशस्वी प्रवास
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर (जिल्हा सोलापूर) आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने सन 2023 साठी शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सोलापूर येथील सुजित सुरेश हावळे (बीएसएनएल अधीक्षक) यांच्या पत्नी सौ. शीला सुजित हावळे, ज्या उत्तर सोलापूर तालुक्यातील सौ. गोपीबाई रामकिसन पापासेठ बलवा हायस्कूल, देगाव येथे शिक्षक पदावर कार्यरत आहेत, यांनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर मिळवलेले सन्मान राज्यस्तरीय दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत त्यांनी जिल्हास्तरावर द्वितीय आणि तृतीय क्रमांक,तालुकास्तरावर प्रथम क्रमांक (एक) आणि द्वितीय क्रमांक (दोन)
असे एकूण पाच पारितोषिके पटकावली. त्यांच्या या उज्वल यशाबद्दल ट्रॉफी, सन्मानपत्र आणि पारितोषिकाची रक्कम प्रदान करून गौरव करण्यात आला.
गौरव समारंभ 29 मार्च 2025 रोजी रंगभवन कार्यालयात आयोजित सन्मान समारंभात त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या वेळी उपस्थित कादर शेख (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद) हवेली मॅडम (माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद) प्राचार्य जितेंद्र साळुंखे (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वेळापूर)अधिव्याख्याता राजे साहेब, शशिकांत शिंदे, गटशिक्षणाधिकारी जमादार, भावसार (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद)यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. या उल्लेखनीय यशाबद्दल सौ. शीला सुजित हावळे यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
0 Comments