वाशिंबे येथील भैरवनाथ यात्रेस आजपासून प्रारंभ
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- करमाळा येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे दि.११ ते दि.१३ रोजी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.यानिम्मित विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शुक्रवार ( दि.११ ) रोजी दुपारी ३ ते ६ देवाचा हळदी समारंभ कार्यक्रम होईल. शनिवार( दि.१२) रोजी पहाटे धार्मिक विधी, अभिषेक ,दंडवत सुरुवात होईल . दुपारी १.३० वाजता मानाच्या कावडीची गावातील मुख्य चौकातून सवाद्य कावडी नृत्य मिरवणूक काढण्यात येईल. व रात्री ८ वाजता देवाचा छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात येते. रविवार ( दि.१३ ) रोजी सकाळी ७ वाजता छबिना व पालखी सोहळा व दुपारी १२ वाजता महाआरती होते. त्यानंतर भैरवनाथ मंदिर परिसरात दुपारी ३ वाजता निकाल जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. विजेता पहिलवानाला भैरवनाथ केसरीची गदा व बक्षिस दिले जाणार आहे.येणाऱ्या भाविकांसाठी भैरवनाथ मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थ यांनी यात्रा उत्सवाचे नियोजन केले आहे.
0 Comments