Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर परीसरात अवैध धंद्यावर कारवाई

पंढरपूर परीसरात अवैध धंद्यावर कारवाई



 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर ग्रामीण पोलीस घटकाकडे परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक म्हणून श्रीमती अंजना कृष्णा या प्रशिक्षण घेत असून त्या सद्या पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहत आहेत. अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशावरून पंढरपूर ग्रामीण परीसरातील पुढील प्रमाणे अवैध धंद्यावर धडक कारवाई केली आहे.

अवैध दारू विक्रीवर छापा
मौजे भावळवणी, ता. पंढरपूर येथे काही इसम अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून श्रीमती अंजना कृष्णा यांनी दिनांक ०७.०४.२०२५ रोजी वेगवेगळी पथके तयार करून सदर गावातील अवैध दारू विक्री करणारे  इसम नामे हणमंत भिमराव लिंगे, समानधान ज्ञानेश्वर वाघमारे, भिमराव नाना शेरक, मुकुंद शंकर लोखंडे यांच्यावर एकाच वेळी छापा घातला. सदर छापा कारवाईत एकूण १,०८,९४९/- रूपये किंमतीची अवैध देशी विदेशी दारू मिळून आली असून वरील सर्व आरोपींविरूध्द पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अवैध वाळू उपस्यावर कारवाई दिनांक ०८.०४.२०२५ रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्रदीतील मौजे चिंचोली भोसे, ता. पंढरपूर येथे भिमा नदीच्या पात्रात टॅक्टरच्या सहाय्याने अवैधपणे वाळूचा उपसा करून विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती मिळाल्यावरून श्रीमती अंजना कृष्णा, सहायक पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला असता नदीपात्रात ५ ट्रॅक्टर ट्रोलीसह, स्वीप्ट कार, मोटार सायकल तसेच ५० ते ६० ब्रास वाळू असा एकूण ३९,७८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर वाळू प्रकरणी बालाजी लक्ष्मणपवार, संजय पवार व इतर यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण,  प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अर्जुन भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती अंजना कृष्णा व्ही एस, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील, विरसेन पाटील, श्रीमती ज्योती बैनवाड, संजय राऊत यांच्यासह पोहेकॉ अमर सुरवसे, पांडूरंग ढवळे, राजकुमार ढोबळे, पोना ईलाई मुलाणी, रविंद्र बाबर, पोकॉ आयाज काझी, पोकॉ म्हेत्रे, पोकॉ गणेश पाटील, पोकॉ हणमंत हिरेमठ यांनी पार पाडली आहे.

 

Reactions

Post a Comment

0 Comments