Hot Posts

6/recent/ticker-posts

गुन्हेगार होणार पोलीसांच्या सहकार्याने होणार शासकीय योजनेचे लाभार्थी

 गुन्हेगार होणार पोलीसांच्या सहकार्याने होणार शासकीय योजनेचे लाभार्थी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हेगारांना गुन्हेगारीच्या दलदलीतून | बाहेर पडण्यासाठी " पहाट " हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हयातील पोलीस अधीक्षक ते पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकारी यांना वारंवार गुन्हे करणारे आरोपींना दत्तक दिले आहे. सदर आरोपींच्या हालचालीवर पालक आरोपी हे लक्ष ठेवून असून ते त्यांच्याशी नियमीत संपर्कात आहेत. त्यांच्यावर दाखल केसेस, त्यांचे कुटूंबीय यांची देखील माहिती घेतली आहे. तसेच त्यांना गुन्हेगारीपासून बाहेर | येण्यासाठी मदत करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यावर सुरूवातीस भर देण्यात येत आहे. यासाठी  दिनांक ०१.०४.२०२५ रोजी पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे शासनाकडून अनुसुचीत जाती व जमातीमधील गुन्हेगार तसेच शेती असणारे गुन्हेगारांना बोलावण्यात आले होते. 



तसेच | शासनाकडील समाज कल्याण विभाग, कृषी अधिकारी, आदिवासी विकास प्रल्कप यांचे अधिकारी हजर होते. या विभागाकडून विविध योजनांची माहिती त्यांना देवून हजर असलेल्या गुन्हेगारांमधून पात्र उमेदवारांचे आवश्यक | कागदपत्र व विहीत नमुन्यातील फॉर्म जागीच भरून घेण्यात आले आहेत. यामुळे लवकरच अशा गुन्हेगारांना या योजनांचा शासकीय नियमानुसार लाभ दिला जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने रिक्षा खरेदी, दुकान, सायकल, पिठाची गिरणी, तिकट काडंप मशिन या मिळणार आहेत. यामुळे गुन्हेगारांना त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण होण्यासाठी | चलन उपलब्ध होणार आहे. तसेच ज्यांच्या नावे शेती असून ७/१२ उतारा आहे त्यांना कृषी विभागाकडील | योजनांचा लाभ मिळणार आहे. सदर मेळाव्यास डॉ. भोगे, मानसोपचार तज्ञ, श्रीमती शैलजा क्यातम, सहायक सरकारी वकील गणेश चादरे, सामाजीक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले असून गुन्हेगारी तसेच वाईट | व्यसनांपासून दूर राहण्याबाबत उपचार पध्दती, जिवन पध्दती याबाबत मार्गदर्शन केले आहे.



सदर मेळाव्यास अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, | पोलीस ठाणेकडील नोडल अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालायतील पोलीस निरीक्षक अतुल मोहीते, | सहायक पोलीस विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे हे उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments