सहकार महर्षी कारखाना सेवक पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
अकलूज : सहकार महर्षी साखर कारखाना सेवक पतसंस्थेच्या नूतन संचालक निवडीप्रसंगी जयसिंह मोहिते-पाटील व मान्यवर.
अकलूज :(कटुसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी युवराज इनामद यांची तर व्हॉइस चेअरमनपदी पांडुरंग इनामदार यांची निवड करण्यात आ आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना
सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित शंकरनगर अकलूज या संस्थेची २०२५ ते २०३० या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्य विजयसिंह मोहिते-पाटील तसेच चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील व संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या या पतसंस्थेने कामगारांच्या हितासाठी विविध निर्णय घेत नेहम् कामगार हित जोपासले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने ही निवड बिनविरोध पडली. सचिवपदी अभिजित माने-देशमुख, खजिनदार म्हणून केशव मो तर संचालक म्हणून गणेश लोकरे, अशोक डोके, बाळासाहेब किर्दकर, गुलाब देशमुख, संतोष नाशिककर, कल्याण जाधव, नामदेव सावंत, संद खंडागळे, नागेश झपके यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मॅनेजर म्हणून नागेश राजमाने हे काम पाहत आहेत. या निवडीबद्दल सर्व नूतन संचालकांचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी सत्कार केला..
0 Comments