Hot Posts

6/recent/ticker-posts

अनिल सावंत यांच्या मंगळवेढ्यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 अनिल सावंत यांच्या मंगळवेढ्यातील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


मंगळवेढा : (कटुसत्य वृत्त):- गुढीपाडवा व नव्या मराठी वर्षाचे साधून मंगळवेढा शहरात

भैरवनाथ शुगर्सचे व्हा. चेअरमन, मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ढोबळे म्हणाले की, भविष्यात या तालुक्यात शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा लागेल. संघर्षाचे राजकारण करण्यासाठी प्रसंगी दामाजीपंतांसारखे अधिकाऱ्यांना हात जोडून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवा, अशी विनंती करू, असे म्हणाले.
काँग्रेस कार्याध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले की, दर सोमवारी आपल्या कार्यालयात जनतेच्या अडीअडचणी संदर्भातील अर्ज घेऊन ते सामुदायिकरित्या शासकीय कार्यालयात गेले तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील. राष्ट्रवादीचे राहुल शहा म्हणाले की, शरद पवार यांना मानणारे
तालुक्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर सातत्याने जनतेच्या संपर्कात राहण्याचे काम अनिल सावंत यांनी केले. अनिल सावंत म्हणाले की, राज्यात सत्ता नसली तरी महाविकास
आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मंगळवेढा तालुक्यातील नागरिकांनी आपल्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी
जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून मतदारांनी जनतेने आपल्या अडीअडचणी लेख स्वरुपात द्याव्यात. जेणेकरून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता येईल.
यावेळी चंद्रशेखर कोंडूभैरी, प्रा. येताळा भगत, राहुल घुले यांची भाषणे झाली. यावेळी मतदारसंघ अध्यक्ष संतोष रंदवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, दत्तात्रय भोसले, नारायण गोवे, साहेबराव पवार, जमीर इनामदार, स्मिता अवघडे, नितीन पाटील, गुलाब थोरबोले, अजय अदाटे, बळवंत पाटील, पंकज चव्हाण, काशीनाथ सावंजी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते..

Reactions

Post a Comment

0 Comments