Hot Posts

6/recent/ticker-posts

दूध आणि खवा उत्पादकांसाठी गोड बातमी

 दूध आणि खवा उत्पादकांसाठी गोड बातमी

आजपासून औद्योगिकऐवजी शेतीसाठीच्या | एक कोटी वीज शुल्काची अंमलबजावणी | वृक्षतोड थांबणार
मुंबई : दुष्काळग्रस्त असा शिक्का धाराशिव जिल्ह्याच्या कायम मागे लागलेला. पण भूम तालुका त्याला नेहमीच अपवाद ठरला, तो येथील शेतीपूरक दुग्ध व्यवसायामुळे. येथील चविष्ट खव्याची चव साऱ्या महाराष्ट्राने चाखलेली आहे. परंतु हा खवा बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात वर्षाला सरासरी एक कोटी वृक्षतोड करावी लागते. पण आता राज्य सरकारने इंडक्शन मशीनवर बनवल्या जाणाऱ्या खव्याला शेतीनुसार वीज जोडणी देण्याची मान्यता दिली आहे. वीज नियामक आयोग आजपासून औद्योगिक नाहीतर कृषी आणि अन्य यानुसार वीज आकारणी करणार आहे. या अंमलबजावणीमुळे दूध आणि खवा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण त्याचबरोबर वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीनेदेखील राज्य सरकारने हा
धाडसी निर्णय घेतला आहे. धाराशिव (आकांक्षित) जिल्ह्यातील भूम वाशी, कळंब, परांडा परिसर सतत दुष्काळग्रस्त असून, येथील शेतकरी, महिला, युवक यांचे प्रामुख्याने दूध निर्मि हेच जीवन्नोतीचे साधन आहे परंतु शेतीपूरक व्यवसाय असूनही सध्या इलेक्ट्रिक भट्टीसाठी लागणारे औद्योगिक वीजशुल्क परवडणारे नाही. परिणामी पारंपरिक लाकूड ज्वलनावर आधारित खवा पैढे निर्मिती येथे होत आहे. पारंपरिक पद्धतीने एक किलो खवा तयार करण्यासाठी तीन किलो लाकूड लागते, याचा अर्थ वर्षाला अंदाजे
तीन लाख किलो लाकूड लागते. त्यासाठी महाराष्ट्रात वर्षाला सरासरी एक कोटी वृक्षांची कत्तल करावी लागते. पण शासनाच्या निर्णयामुळे आता येत्या काळातील सर्व वृक्षतोड थांबणार आहे. खवा निर्मितीसाठी होणारी वृक्षतोड बंद व्हावी, या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यामध्ये शासनाच्या सहकार्याने
खवा क्लस्टर भूम यांनी इंडक्शन मशीनद्वारे सोलरवरती खवा निर्मिती करण्याचा भारतातील पहिला
प्रकल्प सुरू केला. तो यशस्वीही सुरू आहे. परंतु सर्वसामान्य खवा उत्पादकांना व खवा क्लस्टर
भूम यांना खवा उत्पादनासाठी इंडस्ट्रियल टेरिफच्या माध्यमातून दिली जाणारी वीज जोडणी ही सर्वात मोठी अडचण होती. सोलरवरती चालणारी इलेक्ट्रिकल इंडक्शन मशीन बनवलेली आहे. परंतु एक मशीन चालवण्यासाठी किमान २५ किलोवॉटचे इंडस्ट्रियल टेरिफमध्ये वीज कनेक्शन घ्यावे लागते. त्याचे फिक्स चार्जेस मोठ्या प्रमाणात भरावे लागतात. त्यामुळे ते शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते. या शुल्कसंदर्भात तीन ते चार वर्षांपासून निर्मल प्रॉडक्ट असोसिएशन, खवा क्लस्टर भूमचे अध्यक्ष विनोद जोगदंड यांनी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. महावितरण विभागाचे सहव्यवस्थापकीय
संचालक राहुल गुप्ता यांनीदेखील तातडीने पावले उचलून हा वीज शुल्काचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे वृक्षतोड थांबण्यात मोलाचे योगदान दिले आहे.
■ धाराशिव जिल्ह्यामध्ये खवा निर्मिती दररोज सरासरी ४० ते ५० टन
■ संपूर्ण महाराष्ट्रात खवा निर्मिती दररोज ९०० ते १,००० टन
■ भूम तालुक्याच्या २५ किलोमीटर परिघातील एकूण गावे : १६०
■ भूम तालुक्यात होणारे खवा उत्पादन ३० मेट्रिक टन (प्रतिदिन)
■ खव्याचे वार्षिक उत्पादन १०,००० मेट्रिक टन
■ दररोज संकलित होणारे दूध अंदाजे ५ लाख लिटर
■ खवा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे दूध : २ लाख लिटर
नवीन वीजशुल्क अंमलबजावणीचा फायदा
॥ सद्यस्थितीत खवा व्यवसायातून राज्यात दोन ते अडीच लाख दूध, खवा व पेढा उत्पादक यांना रोजगार
॥ वीज शुल्कातील बदलामुळे आणखी तीन ते चार लाख महिला व तरुणांना नवीन रोजगार मिळेल.
■ पर्यावरणपूरक खवा निर्मितीमुळे उत्कृष्ट प्रतीच्या खव्याच्या निर्यातीमध्ये मोलाची भर पडेल.
तातडीने वीज जोडणी करून देऊ
औद्योगिकऐवजी कृषी आणि अन्य या शुल्कामध्ये वीज जोडणीसाठी
खूप कमी खर्च येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खवा उत्पादकांनी याचा
लाभ घेण्यासाठी नवीन वीज कनेक्शनचे व सोलरचे प्रस्ताव महावितरणला
ऑनलाइन सादर करावेत. आम्ही त्यांना तातडीने वीज जोडणी करून देऊ.
- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण, संभाजीनगर

Reactions

Post a Comment

0 Comments