Hot Posts

6/recent/ticker-posts

दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत लक्ष्मीकांत कोगनुरे यांचा वाढदिवस साजरा

 दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत लक्ष्मीकांत कोगनुरे यांचा वाढदिवस साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे महादेव कोगनुरे यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत कोगनुरे यांच्या वाढदिवसानिमित्त यलगुलवार  प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देवून साजरा करण्यात आला.

आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्त लाखो रुपये खर्च करून वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत कोगनुरे या तरुणाने आपला वाढदिवस दिव्यांग मुलांच्या बरोबर साजरा केला.लक्ष्मीकांत कोगनुरे यांने समाजाला व आजच्या तरुण पिढीला आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची प्रचितीच करून दिली. एकीकडे आजचा युवक आपल्या वाढदिवसाच्या निमित्त विनाकारण फटाके, बँड, केक याच्यामध्ये लाखो रुपयाची उधळून करून वाढदिवस साजरा करतो पण लक्ष्मीकांत कोगनुरे यांनी असे न करता अनाथ व मतिमंद मुलांच्या बरोबर वाढदिवस साजरा केला.

दिव्यांग विद्यार्थ्यांन मिष्ठान्न भोजन देवून लक्ष्मीकांत कोगनुरे यांने सर्वांचे आभार मानून आशिर्वाद घेतला.या प्रसंगी दिव्यांग विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित केला. ब-याचदा दिव्यांग विद्यार्थ्यांनकङे दुर्लक्ष केलं जात. परंतू तेही मुलेच आहेत.त्यांच्या मनाला आनंद मिळावा,यासाठी लक्ष्मीकांत कोगनुरे यांनी जपलेल्या जाणीवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments