Hot Posts

6/recent/ticker-posts

वाढत्या तापमानामध्ये झाडे जगविण्याची श्री सिद्धेश्वर फाउंडेशनची धडपड

 वाढत्या तापमानामध्ये झाडे जगविण्याची श्री सिद्धेश्वर फाउंडेशनची धडपड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर फाउंडेशनने साई मंदिर, होटगी तलावाजवळ १००८ झाडे लावली आहेत. पाटबंधारे विभागाच्या जागेत त्यांच्याच सहकार्याने लोकसहभागातून ही झाडे लावली आहेत. सध्या सोलापूरचे तापमान महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. अशा तापमानामध्ये ही झाडे जगावीत म्हणून श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थअण्णा सर्जे यांनी २६००० लिटरचे टँकर मागवले. कार्यकर्त्यांच्या मदतीने या सर्व झाडांना पाणी दिले.
       सोलापूर शहरातील नामवंत, मान्यवर आणि संस्थांचे मोलाचे योगदान या कार्यासाठी लाभले आहे. फाउंडेशनचे कार्यकर्ते सुट्टीच्या दिवशी जाऊन झाडांची देखभाल करतात. गेल्या काही दिवसात उन वाढले आहे म्हणून खाजगी टँकर मागवून ही झाडे जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. फाउंडेशनने आजपर्यंत सोलापूर परिसरात साडेतीन हजार झाडे लावून जगविली आहेत. झाडे लावून जगविण्याकडे विशेष लक्ष फाउंडेशनचे कार्यकर्ते देतात.
       आजच्या कार्यात सिद्धाराम आलुरे, सचिन व्हनमाने, शरणप्पा बरमदे, रमेश गुरव यांचे अनमोल सहकार्य लागले. सोलापूरचे तापमान कमी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या कार्यामध्ये तमाम सोलापूरकरांनी सहभाग घ्यावा असे आवाहन श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थअण्णा सर्जे यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments