रविवारपासून 'राष्ट्रवादी'च्या संवाद मेळाव्याचे आयोजन : बाळराजे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 4, 2025

रविवारपासून 'राष्ट्रवादी'च्या संवाद मेळाव्याचे आयोजन : बाळराजे

 रविवारपासून 'राष्ट्रवादी'च्या संवाद मेळाव्याचे आयोजन : बाळराजे




मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती त्याचबरोबर अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील सर्वच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांमधील पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी ६ ते १९ एप्रिलदरम्यान बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकनेते शुगरचे अध्यक्ष बाळराजे पाटील यांनी दिली.
पोखरापूर जि.प.गटातील खवणी येथे, मंगळवार ८ रोजी आष्टी जि.प. गटातील गिड्डेवाडी येथे, १० रोजी गुरुवारी कुरुल गटातील सोहाळे, १५ एप्रिल मंगळवारी पेनूर गटातील शेजबाभूळगाव,१९ रोजी शनिवारी नरखेड जि.प. गटातील भोयरे येथे सायंकाळी सहा वाजता बैठक पार पडणार आहे. यावेळी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बाळराजे पाटील व सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी केले.
या उपक्रमासाठी अस्लम चौधरी,भारत सुतकर, प्रकाश चवरे,बाळासाहेब भोसले,दत्तात्रय पवार,दिलीप पाटील, राजाभाऊ गुंड पाटील,ज्योत्स्ना पाटील, शुभांगी लंबे, राहुल मोरे, कुंदन धोत्रे,नागराज पाटील, मुकुंद आवताडे,यशोदा कांबळे आदी पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

चौकट
आगामी निवडणुकीबाबत विचारविनिमय
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यातून माजी आ.राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये माजी आमदार यशवंत माने यांच्या पाठपुराव्यातून यापूर्वी मंजूर झालेली चौफेर विकासकामे सुरू आहेत.विधानसभा निवडणुकीत तब्बल ९५ हजारांपेक्षा जास्त मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या उमेदवाराला पसंती देऊन विकासकामाला असलेला पाठिंबा अबाधित ठेवला आहे. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधता यावा तसेच सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळराजे पाटील, अध्यक्ष, लोकनेते शुगर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages