Hot Posts

6/recent/ticker-posts

वेरुळ येथून निघालेली जिजाऊ रथयात्रा २५ मार्चला सोलापुरात दोन दिवस मुक्काम असेल

 वेरुळ येथून निघालेली जिजाऊ रथयात्रा २५ मार्चला सोलापुरात दोन दिवस मुक्काम असेल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ आयोजित मराठा जोडो अभियान जिजाऊ रथयात्रा सोलापूर जिल्ह्यात येत आहे. या यात्रेचा सोलापुरात दोन दिवस मुक्काम असेल. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी साडेपाच वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात यात्रेचे आगमन होईल. जिजाऊ रथ यात्रेच्या स्वागताची तयारी मराठा सेवा संघाच्या सोलापूर शाखेच्या वतीने केली जात आहे.शहरात ठिकठिकाणी समाज बांधवांच्या बैठका घेऊन जिजाऊ रथयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. १८ मार्चला छत्रपती शहाजी महाराज यांच्या जन्मदिनी भोसले गढी वेरूळ येथून या जिजाऊ रथयात्रेची सुरुवात होणार आहे. तर एक मे महाराष्ट्र दिनी पुण्यातील लालमहालात तिची सांगता होईल. २५ मार्चला छत्रपती संभाजी महाराज चौक, जुना पूना नाका येथे जिजाऊ रथाचे आगमन झाल्यानंतर जंगी स्वागत होईल.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून चार हुतात्मा चौकात
जाहीर सभा होणार आहे. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून यापूर्वी मराठा सेवा संघाने जिजाऊ रथयात्रेचे यशस्वी आयोजन केले आहे. मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सेवा संघाच्या सर्व कक्षाच्या वतीने स्वागताची तयारी केली जात आहे. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील,जिल्हाध्यक्ष डॉ. जे. के. देशमुख,शहराध्यक्ष सूर्यकांत पवार, सदाशिव पवार, दत्ता मुळे, उज्ज्वला साळुंखे,लक्ष्मण महाडिक, प्रकाश ननवरे, आर.पी. पाटील, दीपक शेळके, अविनाश गोडसे हे पदाधिकारी शहरात विविध भागांत बैठका घेऊन समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. जळे सोलापूर, दमाणी नगर, गवळी वस्ती, निराळे वस्ती, यश नगर,मोदी, संतोष नगर, बैठका झाल्या आहेत. या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

चौकट
अशी असेल जिजाऊ रथ यात्रा
- १८ मार्च : वेरूळ, गंगापूर, नेवासा अहिल्यानगर
- १९ मार्च: अहिल्यानगर, श्रीगोंदा, दौंड, बारामती
- २० मार्च: बारामती, फलटण, वाठार, सातारा
- २१ मार्च: सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, कराड, इस्लामपूर, कोल्हापूर
- २२ मार्च : कोल्हापूर, हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर, सांगली
- २३ मार्च: सांगली, तासगाव, कवठे महांकाळ, सांगोला, पंढरपूर
- २४ मार्च: पंढरपूर, अकलूज, टेंभुर्णी, कुर्डुवाडी
- २५ मार्च: कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर
- २६ मार्च: सोलापुरातून तुळजापुरमार्गे पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

Reactions

Post a Comment

0 Comments