पाच शिक्षणसेवक सेवामुक्त
सीईओ कुलदीप जंगम यांनी केली कारवाई
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सहा वर्षापूर्वी झालेल्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात समाविष्ट असलेल्या आणि खोटी कागदपत्रे सादर करून नौकरी मिळविलेल्या पाच शिक्षणसेवकांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सेवा समाप्तीची कारवाई केली आहे शालेय शिक्षण विभागाच्यावतीने २०१९ मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या घोटाळ्यातील सुमारे ७८७४ उमेदवाराविरुध्द पुणे शहर पोलीस स्टेशन सायवर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात या पाच शिक्षण सेवकांचा समावेश होता. शिक्षण सेवक म्हणून २६ जुलै २०२४ मध्ये रुजू झालेल्या या पान शिक्षकांनी २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत बनावट व खोटे स्वयं प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली होती. टीईटी परीक्षेला बसण्यास कायमस्वरुपी प्रतिबंधीत केले असताना त्यांनी खोटी माहीत सादर करून टीईटी परीक्षा पुन्हा एकदा देऊन सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळवली. चौकशीत हो सर्व माहिती समोर आली त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी त्यांना सेवामुक्त फेल्याचा आदेश ११ मार्च रोजी काढला आहे. यात सांगोला तालुक्यातील कोळेवाडी प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे दिलीप भोये यांना २०१९ साली झालेल्या टीईटी परीक्षेत ७४ गुण मिळाले होते. ते वाढवून त्यांनी ८६ गुण मिळाले असल्याचे दाखवले आहे. सांगोला तालुक्यातील गावडे- गायकवाड वस्ती येथे कार्यरत असणारे कांतीलाल वाकडे या शिक्षण सेवकाला टोइंटी परीक्षेत ६० गुण मिळाले होते. ते वाढवून ८४ केले आहेत. सांगोला तालुक्यातील कोळेकरवाडी येथे कार्यरत असणाच्या परशुराम वाकडे या शिक्षण सेवकाला टोइंटी परीक्षेत प्रत्यक्षात ६० गुण मिळाले होते. ते वाढवून ८७ करण्यात आले. पंढरपूर तालुक्यातील पेहे येथे कार्यरत असणान्या शिक्षण सेविका प्रियदर्शनी मिसे यांना टीईटी परीक्षेत ६२ गुण मिळाले होते. से वाढवून ८६ करण्यात आले, तर करमाळा तालुक्यातील मिवरवाडी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणान्या ऊर्मिला गंभीरे यांना टीईटी परीक्षेत ५७ गुण मिळाले होते. ते वाढवून ८७ करण्यात आल्याचा ठपकाही सेवामुक्त केलेल्या आदेशात ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षणसेवकात खळबळ उडाली आहे.
0 Comments