कुंडलिक मोरे ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत.
लातूर(कटूसत्यवृत्त):-लातूर जिल्हा ग्रंथालय संघाने कै.अड. त्रंबकदास झंवर आदर्श ग्रंथालय कार्यकर्ता राज्यस्तरीय पुरस्कार आमदार अभिमन्यू पवार, औसा मतदार संघ यांचे हस्ते देऊन ग्रंथालय संघाच्या अधिवेशनात सन्मानीत करण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि रोख रुपये 11,000/_ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रंथालयाचे विविध पुरस्कारही वितरण करण्यात आले. राज्यात ग्रंथालय चळवळीचे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याची प्रथा लातूर जिल्हा ग्रंथालय संघ दरवर्षी करते. या वेळी सहाय्यक ग्रंथालय संचालक, सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, लातूर श्रीमती वंदना देशमुख, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, कार्याध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील, राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष रामेश्वर पवार, लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभाकर कापसे, राम मेकले, सोलापूरचे विनोद गायकवाड, छाया मोरे, वृषाली हजारे, प्रकाश मोरे, सारिका माडीकर, सारिका मोरे, गीतांजली गंभीरे, राजश्री माशाळकर, सौ पिंगळे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments