पीएम किसानसाठी फार्मर आयडी असणे बंधनकारक
सोलापूर ( कटुसत्य वृत्त ):- प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेचे अनुदान घेण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक केले आहेत. जिल्ह्यातील पाच लाख ६८ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी फार्मर आयडीचे काढून घेतले आहेत.
राज्य शासनाने राज्यात अॅग्रीस्टॅक योजना आणली आहे. यात सातबारा उतारा हे आधारकार्ड आणि बँक खात्यांशी लिंक केले जात आहेत. यापुढील काळात नुकसान भरपाई, पिक विमा, नमो सन्मान योजना, पीएम किसान सन्मान निधी, पीक कर्ज वाटपासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फार्मर आयडी काढून घेण्यासाठी शिबीरे घेतली जात आहेत.
आधार कार्डावरील माहितीच्या आधारे हे ओळखपत्र देण्यात येत आहे. आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहेत. त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पडताळणी करून अशा अर्जावरही तलाठ्यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश भूमी
अभिलेख विभागाने दिले आहेत. मात्र, असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांनाच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने पीएम किसान या योजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांरणाद्वारे जमा केला आहे. परंतू २१ व्या हप्त्यासाठी अॅग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक केली आहे.
चौकट 1
आधार आणि सातबारावरील नावात फरक
पूर्वीच्या काळात शेतखरेदी आणि वारसा नोंदीत नावे लावताना योग्य ती खबरदारी घेतली नाही. सातबारा उताऱ्यावर एक नाव आणि त्याच नावात थोडासा बदल असलेला आधार कार्डवर दुसरे नाव आहे. त्यामुळे
फार्मर आयडी मिळविताना शेतकऱ्यांना पुन्हा सातबारा उताऱ्यावरील नावासारखे आधार कार्डवर नाव दुरुस्त करुन घ्यावे लागत आहे. दुसरीकडे आधारला मोबाईल नंबरही अपडेट
करुन घ्यावा लागत आहे.
0 Comments