Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा सेवा संघाची 'जिजाऊ रथ यात्रा' नियोजन बैठक उत्साहात

 मराठा सेवा संघाची 'जिजाऊ रथ यात्रा' नियोजन बैठक उत्साहात


अनगर येथे २५ मार्च रोजी स्वागत; मोहोळमध्ये सवाद्य फेरीसह सभेचे आयोजन
मोहोळ ( कटुसत्य वृत्त ):- मराठा सेवा संघ मोहोळ तालुका आयोजित जिजाऊ रथयात्रा नियोजनाची बैठक सेवा संघाच्या कार्यालयात विविध विषयावर चर्चा होऊन पार पडली.
'अनिस' चे राज्य सदस्य डॉ. गोविंद पाटील, मराठा सेवा संघ जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू थिटे, सदस्य तानाजी चटके, डॉ प्रमोद पाटील, अॅड. श्रीरंग लाळे, पत्रकार रमेश दास, कल्याण गव्हाणे, वैभव गुंड, मनोज मोरे, दिपक पारडे यांच्या प्रमुख उपस्थिती होती. २५ मार्च रोजी मोहोळ तालुक्यात जिजाऊ रथ यात्रा येणार आहे त्याच्या नियोजनासाठी समन्वय समिती चर्चेद्वारे तयार केली जाणार असून, यात सर्व जाती धर्मातील मराठा सेवा संघ कार्यकर्त्यांना समन्वयक म्हणून नेमण्यात येणार आहे. तालुक्याच्या वतीने २५ मार्च रोजी अनगर येथे सकाळी ११ वाजता स्वागत आणि नंतर बारा वाजता रथयात्रा मोहोळ शहरात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बुद्ध विहारपर्यंत फेरी होईल तेथे चैत्यभूमीला अभिवादन करून बुद्ध मूर्तीस
पुष्प अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर कन्या प्रशाला मार्गे लोकसेवा हॉटेल कॉन्फरन्स हॉल मध्ये सभा आणि भोजनानंतर कार्यक्रमाची समाप्ती होणार आहे. तसेच शहरात महापुरुषांच्या विचारांचे डिजिटल लावण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या जातीं धर्मांच्या समूहाने रथ यात्रेचे स्वागत करीत समता, बंधुता आणि प्रेमभाव जपत सहभाग होणार आहेत. यावेळी तुकाराम बीज निमित्त प्रतिमा पूजन करुन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सावळेश्वरच्या नूतन सरपंच पदी निवड झालेले सखाराम साठे सर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. नव्याने सुरू होणाऱ्या शाहीर विश्वासराव फाटे वैचारिक वाचनालयासाठी उपलब्ध पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष मनोज मोरे यांनी,
सूत्रसंचालन कोषाध्यक्ष दीपक पारडे यांनी तर सचिव आकाश फाटे यांनी आभार मानले.


चौकट 1

शाहीर खाडे यांचादमदार पोवाडा सोलापूर येथील शाहीर रमेश खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा पोवाडा आपल्या पहाडी आवाजात गायन करून उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. मराठा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments