संभाजी ब्रिगेडच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन; हिंदू-मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश
करमाळा (कटूसत्य वृत्त):- तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड आयोजित रमजान पवित्र महिन्याच्या निमित्ताने अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले की, संभाजी ब्रिगेड हि संघटना सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्रित घेऊन चालणारी एकमेव संघटना आहे. जाती-जातीत तेढ निर्माण न करता सर्व जातीतील बांधवांना एकत्रित घेऊन काम करणारी व महापुरुषांच्या विचारधारेवर सर्व समाज बांधवांचं संघटन करणारी संघटना आहे. काही समाजकंटक जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. व स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहे. तरी समाज बांधवांनी अशा चिथावणी खोर लोकांपासून सावध राहावे. हा द्वेष रोखण्याचं काम व जातीय सलोखा राखण्याचे काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे.
यावेळी या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, बाळासाहेब झोळ, निलेश पाटील, ता.अध्यक्ष सुहास पोळ, शहअध्यक्ष अतुल निर्मळ, पिंटू जाधव, आदिनाथ माने, धनंजय गारुडी, सचिन कसबे, सागर कोठावळे, सागर साखरे, अजित उपाध्ये, अविनाश घाडगे, विठ्ठल जाधव, बनकर, नाना साहेब पोळ, अशितोष कसबे आदि कार्यकर्ते व बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
0 Comments