Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर ?

 सोलापुरात १७५ ट्रक कांद्याची आवक; 

उन्हाळी कांद्याला कसा मिळतोय दर ?

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी १७५ ट्रक कांद्याची आवक होती. दर कमी झाल्याने मागील काही दिवसांपासून आवक घटली आहे. आंध्र व तेलंगणामध्ये कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे मागणी घटली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळी कांद्याला दर मिळालेला नाही. मागील पंधरा दिवसापूर्वी जवळपास २५० ट्रक कांद्याची आवक होत होती.

मात्र दरात घसरण झाल्याने आवकही घटली आहे. सध्या कमाल दर २००० रुपयांपर्यंत आहे. सरासरी दर १२०० रुपये प्रतिक्विंटल आहे. १ एप्रिलपासून दर वाढण्याची शक्यता आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments