टपरीवर चहा पिणाऱ्याने केला वाल्मिक गँगचा 'गेम ओव्हर',
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट
बीड(कटूसत्य वृत्त):-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिवसेंदिवस मोठी माहिती समोर येत आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झालेल्या मारहाणीमुळे सुदर्शन घुले याला वाल्मीक कराडने बदला घ्यायला सांगितलं, असा खुलासा जयराम चाटे याने केला आहे.
एकीकडे सुग्रीव कराडचं नाव समोर येत असताना आता आवादा एनर्जी कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला आहे. नेमकं काय झालं? वाल्मिक गँगचा पाय खोलात कसा गेलाय ? सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब महत्त्वाचा ठरला. सहा डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला. या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली. त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले त्यांना सुदर्शन लेने वाल्मीक कराडचा माणूस आहे. कंपनी सुरू ठेवायचं असेल तर कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या, अशी धमकी दिली, असा जबाब त्याठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला. तुला जिवंत सोडणार नाही - प्रत्यक्षदर्शीचा जबाब त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू या अशी विनंती करू लागले. मात्र सुदर्शन घुलेने सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती, असा जबाब त्याठिकाणच्या चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला आहे. या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत.
0 Comments