Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा- महारुद्र परजणे

 हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा- महारुद्र परजणे





नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे नातेपुते पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी इफ्तार पार्टीप्रसंगी सांगितले. नातेपुते पोलीस ठाणे  यांच्या वतीने नातेपुते येथील शाही मज्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. २०० मुस्लिम बांधव इफ्तार पार्टीसाठी उपस्थित होते. इफ्तारच्या वेळी रोजाच्या उपवासनिमित्त फळे व मिठाईचे आयोजन नातेपुते पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी सपोनि महारुद्र परजणे यांनी मौलाना मेराज समशी यांना हार घालुन रमजान महिना उपवासाच्या व ईदच्या शुभेच्छा दिल्या तर मुस्लिम बांधवांच्या वतीने सपोनी महारुद्र परजणे यांचाही हार घालून सन्मान करण्यात आला. यावेळी  नातेपुते पोलीस ठाणे व सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने उपस्थित सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन रमजान ईद, गुढीपाडवा तसेच इतर सणानिमित्त हद्दीत कोठेही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टी दरम्यान केले.यावेळी मौलाना मेराज समशी, आमिन काझी, निजाम काझी, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, गोपनीय विभागाचे अमोल देशमुख, पो.कॉ. नवनाथ चव्हाण, पो.कॉ. मदने, पो.कॉ. बोराटे तसेच होमगार्ड पथकातील होमगार्ड जवान, आरपीआयचे एन.के. साळवे, युवराज वाघमारे, बाळासाहेब सोरटे तसेच मुस्लिम बांधव उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments