ग्रंथालय कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर, कुटूंब संभाळणे अवघड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्यातील ग्रंथालय कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. तुटपुंज्या वेतनावर कुटूंब संभाळणे अवघड होत असल्याने राज्यातील ग्रंथालय कर्मचारी आत्महत्या करत आहेत. मात्र, याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रंथालय कर्मचान्यांकडून होत आहे.
राज्यातील ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालयात २० हजार ३२१ कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची उपजीविका भागविण्यासाठी कर्मचारी यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील जयप्रकाश अग्रवाल सार्वजनिक वाचनालयात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक परिस्थितीला कंटाळून वाचनालयाच्या बाथरूममध्ये आत्महत्या केली आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी गाव तेथे ग्रंथालय चळवळ सुरु केली होती. ती चळवळ जोपासण्याचे काम मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील यांनी तातडीने ४० टक्के अनुदान वाढीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रंथालय कर्मचायांतून होत आहे.
0 Comments