सोलापूरचा प्रकल्प अहिल्यानगरात ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर, पुणे तसेच अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांच्या परिसरात व्यापलेले उजनी धरण सध्या चर्चेत आहे. नियोजित उजनी जलपर्यटन प्रकल्प सोलापूरच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाची ठरणार होता. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात बोटिंग सेवेची निविदा निघाली होती. बोट खरेदीनंतर लवकर बोटिंग सेवाही सुरू होणार इतक्यात निविदाला स्थगिती मिळाली. उजनी जलक्षेत्र जलसंपदा विभागांतर्गत येत असल्याने जलसंपदा विभागाची परवानगी न घेता जलपर्यटन प्रकल्प आराखडा तयार केल्याने जलसंपदा विभागाने यावर नाराजी व्यक्त केली. एकीकडे अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली असली तरी दुसरीकडे हा प्रकल्प अहिल्यानगरात राबविण्यासाठी जलसंपदा विभागाकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीयपटलावर सुरू आहे.
0 Comments