घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा होणारा अवैध वापर थांबवा
ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा होणारा अवैध वापर थांबवा, अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत जामगडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात अवैध वापर होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा उपयोग अवैधप्रकारे ऑटो रिक्षा तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. आमच्या संस्थेच्या स्वयंसेवकांनी या संदर्भात केलेल्या पाहणीत सोलापूर शहर तसेच संबधित तालुक्यांमध्ये अशा ठिकाणांची माहिती व पुरावे मिळविले आहेत. संस्थेद्वारे अशा ठिकाणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक प्रशासकांची यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. घरगुती गॅसच्या अवैध वापरामुळे जिल्ह्यात एखादा मोठा स्फोट होण्याचा धोका आहे. संबंधित विभाग त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याकरीता टाळाटाळ करत असतात, असा आरोप त्यांनी केला आहे. जर स्फोट होऊन निष्पाप नागरीकांच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
घरगुती सिलेंडरवर 5 टक्के जीएसटी आकरण्यात येते तसेच व्यावसायिक सिलेंडर व ऑटो एलपीजी यावर 18 टक्के जीएसटी आकरण्यात येते. या सर्व अवैध प्रकारामुळे महसुल विभागाला 13 टक्के जीएसटीचे थेट नुकसान होत आहे. हा सर्व काळाबाजार आटोक्यात आणला तर सामान्य नागरीकास सिलेंडर 300 रुपयामध्ये सुद्धा मिळु शकतो. घरगुती गॅससिलेंडरचा काळाबाजार नक्की कुठून होतो, असा सवालही प्रशांत जामगडे यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेस रविंद्र ब्राम्हणे, कृष्णा पवार, सोमनाथ पवार आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments