Hot Posts

6/recent/ticker-posts

मनगोळी गावाचा पंधरा वर्षांचा संघर्ष संपण्याची शक्यता

 मनगोळी गावाचा पंधरा वर्षांचा संघर्ष संपण्याची शक्यता

रस्त्यासाठी तीन निवडणुकांवर बहिष्कार;
आमदार खरे यांनी सभागृहात मांडला प्रश्न
मोहोळ/(कटुसत्य वृत्त ):- रस्त्याच्या मागणीसाठी तीन निवडणुकांमध्ये मतदानावर वहिष्कार टाकणाऱ्या मोहोळ तालुक्यातील मनगोळी ग्रामस्थांच्या व्यथा आमदार राजू खरे यांनी विधानसभेत मांडल्या आहेत. खरे यांच्या मागणीमुळे मनगोळी ग्रामस्थांचा रस्त्याच्या मागणीचा पंधरा वर्षाचा संघर्ष संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देशभरात रस्त्याचे जाळे निर्माण करून दळणवळणात सुसूत्रता आणली जात असताना आता आपण मनगोळीकरांनाही विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणार आहोत का? असा सवाल आमदार खरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत विचारला आहे.
मुंबई येथे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खरे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघावावतचे विचारण्याची दुसऱ्यांदा संधी मिळाली. यामध्ये त्यांनी मनगोळी ग्रामस्थांचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडला. मोहोळ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मनगोळी - भैरववाडी गावातील नागरिकांना देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरी अद्याप रस्ता मिळू शकत नाही ही शोकांतिका आहे. मनगोळी- वाळूज, मनगोळी - भैरववाडी, मनगोळी- तडवळे वंधारा या रस्त्यांची कामे झालेली नाहीत. पावसाळ्यात गुडघाभर चिखलातून या मोहोळ-वैराग रस्त्यावर वार्शी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मनगोळी- भैरववाडीच्या शेतकऱ्यांना शेतमालाची ने-आण करावी लागते. फक्त निवडणुका आल्या की प्रत्येकवेळी अधिकारी भेटी देऊन रस्ता करण्याचे आश्वासन देतात. मात्र, येथील रस्ता अद्यापही झाला नसल्याच्या निषेधार्थ या गावातील ग्रामस्थ गेल्या पंधरा वर्षांपासून मतदानावर वहिष्कार टाकतात, ही वाव आमदार खरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेट दिली तरीही रस्त्यावावत अद्यापही मार्ग निघाला नाही. दरम्यान, स्वखर्चातून आमदार खरे यांनी त्या रस्त्याला मुरमीकरण करून दिल्याचे सभागृहामध्ये सांगत या छोट्याशा मनगोळी गावाची व्यथा अर्थमंत्री पवार यांनी सम जून घेत या गावाच्या रस्त्यासाठी निधी देण्याची भावनिक साद घातली. दरम्यान, उपमुख्यमंत्री पवार यांनी या मनगोळी गावच्या रस्त्याच्या प्रश्नासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही आमदार खरे यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments