धान्याप्रमाणेच साड्यांवरही रेशन दुकानदारांचा डल्ला
'अ' परिमंडळातील गैरकारभार चव्हाट्यावर
सोलापूर(कटुसत्य वृत्त):- राज्य शासनाने रेशन दुकानातून गोरगरीब महिलांना धान्यावरोवरच दिलेल्या मोफत साड्यांवरही सोलापूर शहरातील 'अ' परिमंडळांतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांनी डल्ला मारला असून या साड्या गोरगरीव मायमाउलींना वाटप न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावून धान्याप्रमाणेच त्याचाही काळावाजार करण्यात आला. यावरून 'अ' परिमंडळातील
रेशन दुकानदारांचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या काही महिन्यापासून सोलापूर शहरात अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे
यांच्या कारवाईच्या मोहिमेने रेशन दुकानदाराचे धावे दणाणले आहेत. रेशन कार्डधारकांची ईकेवायसी असो किंवा अन्न सप्ताह दिन असो असे शासनाचे सर्वच उपक्रम रावविण्यात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना चांगलेच यश प्राप्त झाल्याने सोलापूर शहराने धान्य वाटपात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकाविला आहे.
दुसरीकडे सोलापूर शहरात विविध ठिकाणी अवैधरीत्या घरगुती गॅस भरणाऱ्या केंद्रांवर भरारी पथकामार्फत धाडी टाकून दोनवेळा कारवाई केल्याने अवैधरीत्या गॅस पॉइंट चालविणाऱ्यांनी देखील चांगलाच धसका घेतला आहे. अशारीतीने पारदर्शक कारभार सुरू असताना 'अ' परिमंडळातील दुकानदारांनी मात्र धान्य वाटपावरोवरच साडी वाटपातही सावळागोंधळ घातला असल्याचे उघडकीस आले आहे. रेशन दुकानदारांनी धान्यातील नेहमीच्या काळ्याबाजाराप्रमाणे साडी वाटप न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावून गरजू मायमालींना
साडीपासून वंचित ठेवले आहे. काही दुकानदार तर अंत्योदय लाभार्थ्यांना पूर्ण धान्य न देता
अर्धवट धान्य देत असल्याचे दिसून आले आहे. या रेशन दुकानदारांना आवर घालण्यात प्रशासन कुठे तरी कमी पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन काळावाजार करणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धान्य व साडीपासून वंचित सर्वसामान्य लाभाथ्र्यांनी केली आहे. यापूर्वी नागरिकांच्या तक्रारीवरून अन्नधान्य वितरण अधिकारी हे भरारी पथक नेमून दोपी दुकानदारांवर कारवाई करत होते. त्यामुळे दुकानदारांवर चांगलाच वचक वसत होता. आता
अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी भरारी पथक नेमून सध्या 'अ'' परिमंडळांतर्गत असलेल्या रेशन
दुकानातून घडत असलेल्या गैरकारभाराची शहानिशा करून सर्वसामान्य लाभार्थ्यांना न्याय मिळवून देतील का ? याकडे रेशन कार्डधारकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments