छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्या चे स्ट्रक्चर ऑडिट करा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 3, 2025

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्या चे स्ट्रक्चर ऑडिट करा

 छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्या चे स्ट्रक्चर ऑडिट करा


 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेले छत्रपती संभाजी महाराज चौक (पुणे नाका) येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट करणे अत्यंत गरजेचे असून तातडीने ते करण्यात यावे  अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने सोलापूर महापालिका नूतन आयुक्त पदी  सचिन ओंबासे  यांची निवड झाल्याबद्दल भेट घेऊन  पुस्तक देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेले छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये विविध कार्यक्रम प्रसंगी अभिवादन करताना महाराजांच्या पुतळा किंचित (व्हायब्रेट) हलल्या सारखे शिवशंभु प्रेमींना जाणवले होते राज्याभिषेक दिना दिवशी सोलापूरच्या आयुक्त शितल तेली उगले या प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती त्यामुळे सदर पुतळ्याचे स्ट्रक्चर ऑडिट करणे चे काम गांभीर्याने 14 मे छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या आत करण्यात यावे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास नव्याने रंगकाम करण्यात यावे या परिसरामध्ये सुशोभीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते त्याची योग्य पद्धतीने स्वच्छता व निगा राखली जावी यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध कार्यक्रमानिमित्त पुष्पहार घालण्यासाठी उंच असल्या कारणाने अनेक वेळा अडचण येते काही वेळा पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुतळ्यावर चढावे लागते त्यामुळे शिवशंभू प्रेमींना अभिवादन करण्यासाठी दोन्ही बाजूने एल टाईप  मजबूत लोखंडी शिडी तयार करण्यात यावी.

त्याचबरोबर येथे असलेला कारंजा 24 तास सुरू ठेवण्यात यावेत. पुतळा परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी काही ठिकाणी किरकोळ कामे राहिलेली आहेत ती कामे करून घेण्यात यावी. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयुक्तांना निवेदनद्वारे करण्यात आले आहे. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्कप्रमुख छत्रगुण माने शहर उपाध्यक्ष संतोष  सुरवसे शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख  दिलीप निंबाळकर गोवर्धन गुंड सलीम शेख शहर महिला उपाध्यक्ष माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages