६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 4, 2025

६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

 ६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना आणि शंकरराव मोहिते- पाटील ब्लड बँक अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ  रज्जाक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात  २५ मुली  २६ मुले आणि १० प्राध्यापक यामध्ये प्रा. डॅा. बाळासाहेब निकम, प्रा. डॉ.संभाजी बनसोडे, प्रा. नारायण माने, प्रा. पंकज कोडलकर, प्रा. हसन मोगल, प्रा. अजित भोपळे,  कालिदास सालगुडे , नितीन जगताप, प्रा. दिपाली राशनकर प्रा. अश्विनी वाघमोडे यांनी  रक्तदान करून डॉ धवलसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अकलूज येथील डॉ.अजित गांधी व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॅा. रज्जाक शेख यांच्या हस्ते रक्त दान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. रक्तदान कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  रक्तदान शिबिराचे समन्वयक, प्रा. डॉ. बाळासाहेब निकम महाविद्यालयाचे सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.जगदीशचंद्र मुळीक प्रा. उत्तम सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला प्रा. डॅा. दत्तात्रय थोरात,प्रा. डॉ. दत्तात्रय शहाणे, डॉ. दत्तात्रय साळवे, प्रा. डॉ. राजेंद्र खंदारे ग्रंथपाल दिलीप शिंदे, प्रा. धाईंजे हनुमंत वाघमोडे आणि या सर्वांचे सहकार्य लाभले. शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज येथील डॉ. अजित गांधी, मयुर माने हनुमंत खंडागळे, अनिल लोखंडे, इंद्रजित कोडलिंगे, सुमन धेंडे, विद्युतलता काळे, भारती भगत, सिद्धांत गोसावी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages