धार्मिक व सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित राहील- योगेश बोबडे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मुस्लीम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, उपवास सोडण्यासाठी नुकतेच २१ मार्च रोजी ओम साईराज मंगल कार्यालय येथे सालाबाद प्रमाणे वर्ष ५ वे बोबडे परिवार व बोबडे पार्टीच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रोजा इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात पार पाडली. धार्मिक व सामाजिक सलोखा आणि गावामध्ये शांतता अबाधित राहील, असे प्रतिपादन भाजपचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांनी व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास शुभेच्छा देताना योगेश बोबडे म्हणाले की, सामाजिक जातिय सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. रमजान हा इस्लाम मधील पवित्र महिना या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कडक रोजे पाळतात. या काळात अन्न किंवा पाणी यांचे ग्रहण केले जात नाही. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधु भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक एकोपा निर्माण होण्याकरिता इफ्तार पार्टीचे मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे.
या इफ्तार पार्टीसाठी मदरसा मस्जिदचे रास्तापुरे रावसाहेब,मक्का मस्जिदचे रहीम तांबोळी,जामा मस्जिदचे रियाज तांबोळी, तिन्ही मस्जिदचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी टेंभुर्णीच्या महिला सरपंच सुरजा बोबडे, उपसरपंच राजश्री नेवसे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शब्बीर जहागीरदार, अनुराधाकाकी बोबडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा स्वराली बोबडे, उद्योजक नागेश बोबडे, दशरथ देशमुख, संतोष तांबडे,आयुब पटेल, सतीश नेवसे, नामदेव धोत्रे, परमेश्वर खरात, श्रीकांत लोंढे, सिकंदर आतार, राहुल टिपाले,बाबा मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य सचिन होदाडे, नागनाथ वाघे, जयवंत पोळ, बाळासाहेब ढगे, गौतम कांबळे, ग्रा.पं.सदस्य प्रतिनिधी सोमनाथ ताबे,राम पवार, यांच्यासह बोबडे पार्टीतील सर्व कार्यकर्ते येथील मुस्लिम समाजातील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments